Boycott Maldives | मालदीवची लोकसंख्या किती लाख? भारत कि,चीन कोणाच्या आधारावर उभा आहे हा छोटासा देश?
Boycott Maldives | मालदीवच्या मंत्र्यांनी भारतीय पंतप्रधानांबद्दल टिप्पणी करुन आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. हे सगळ असच झालेलं नाही. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीनच्या हातात खेळतायत. मालदीवमध्ये भारतीय सैन्य आहे, त्यांनी त्या विरोधात इंडिया आऊटचा निवडणूक प्रचारात नारा दिला होता.
Boycott Maldives | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला लक्षद्वीपला भेट दिली. त्यानंतर मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिउना आणि दुसऱ्या नेत्यांनी काही आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यावरुन दोन्ही देशांमध्ये मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर #ExploreIndianIslands आणि #BycottMaldives ट्रेंड सुरु आहे. वाद वाढत गेल्यानंतर मालदीव सरकार लगेचच बॅकफूटवर गेले. मंत्र्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही हे सांगत, तीन मंत्र्यांना तात्काळ निलंबित केलं. मालदीवमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर दोन्ही देशातील राजकीय संबंधित अनिश्चितता वाढली आहे. चीनच्या बाजूला जास्त कल असलेले मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी निवडणूक प्रचारात ‘इंडिया आऊट’ कॅम्पेनचा नारा दिला होता. त्याआधीचे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची निती ‘इंडिया फर्स्ट’ची होती. मुइज्जू सत्तेवर आल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडत चालले आहेत.
भारत आणि मालदीवमध्ये दोन हजार किलोमीटरच अंतर आहे. भारत मालदीवचा जवळचा शेजारी आहे. मालदीवच्या लोकसंख्येबद्दल बोलायच झाल्यास हिंद महासागर क्षेत्रात या देशाची लोकसंख्या 5 लाखाच्या घरात आहे. मालदीवमध्ये 1000 पेक्षा जास्त छोटी बेट आहेत. लोक इथे सुट्टया एन्जॉय करण्यासाठी येतात. मालदीवच समुद्रासह एकूण क्षेत्रफळ 90,000 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. आशिया खंडातील हा छोटासा देश आहे. इथे बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या वास्तव्याला आहे. भारत आणि मालदीवमध्ये प्राचीन संबंध आहेत. 1965 साली मालदीवल स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर मालदीवशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा भारत जगातील पहिला देश होता.
हाच भारत आणि चीनमधला फरक
भारताने मालदीवला नेहमीच मोठी आर्थिक मदत केलीय. हुकुरु मिस्की रिनोवेशन, उच्च प्रभाव सामुदायिक विकास योजना आणि अन्य द्निपक्षीय योजनांचा समावेश आहे. भारताने निस्वार्थ भावनेतून मालदीवला मदत केली. दुसऱ्याबाजूला चीनने सुद्धा मालदीवमध्ये योजना सुरु केल्या. त्यांना भरपूर कर्ज दिलं व त्या देशात कर्जात बुडवलं.
दोन्ही देशांमध्ये आयात-निर्यात किती?
व्यापारी दृष्टीकोनातून बघायच झाल्यास दरवर्षी भारत आणि मालदीवमध्ये व्यापार वाढत चाललाय. 2023 मध्ये भारताने मालदीवला 41.02 कोटी डॉलर सामानाची निर्यात केली. तेच 61.09 लाख डॉलर सामानाची आयात केली. 2022 मध्ये निर्यातीचा आकडा 49.54 कोटी डॉलर आणि आयातीचा आकडा 61.9 लाख डॉलरचा होता.