काँग्रेसमध्ये पुन्हा घोळ; दिग्गजांनाही गुंता सोडवता येईना म्हणाले…
मल्लिकार्जुन खर्गे यांनी 14, शशी थरूर यांनी 5 आणि के. एन. त्रिपाठी यांच्याकडून अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत उमेदवारांची नावं देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून (Congress President Election 2022) गेहलोत आऊट होऊनही आता आणि पुन्हा एकदा त्यासाठी पक्षात गोंधळ सुरु झाला आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि के. एन. त्रिपाठी यांची नावं पुढे आली आहेत. तिन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री (Madhusudan Mistry) यांनी त्यांच्यापैकी अजून तरी कोणीही पक्षाचा अधिकृत उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हे उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवत असले तरी गांधी कुटुंबाने (Gandhi Family) अजून यापैकी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही असंही त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांनी आधीच स्पष्ट केले आहे की, या प्रक्रियेत त्या तटस्थ राहणार आहेत. त्यामुळे तसा कोणी दावा करत असेल तर ते चुकीचेही असल्याचेही त्यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी 14, शशी थरूर यांनी 5 आणि के. एन. त्रिपाठी यांच्याकडून अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे उद्या ते अर्ज तपासून संध्याकाळपर्यंत आम्ही वैध फॉर्म जाहीर करु आणि उमेदवारांची नावंदेखील जाहीर करू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खर्गे यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह उमेदवारी अर्जांचे 14 प्रतीत अर्ज सादर केला आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी आणि भूपेंद्र हुडा या नेत्यांचा समावेश होता
जे जी-23 चा भाग आहेत. पक्षात बदल करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांचा गट. थरूर हे स्वतः जी-23 चा भाग राहिले आहेत. त्यांनीही उमेदवारी अर्ज पाच प्रतीत सादर केला आहे.
तर झारखंडचे माजी मंत्री त्रिपाठी यांनी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्यासमोर नामांकन अर्ज दाखल केला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात अर्ज सादर केल्या नंतर सांगितले की, वंचित, दलितांच्या हक्कांसाठी मी नेहमीच लढत राहिलो आहे.
तसेच अगदी लहान असल्यापासून माझा आणि काँग्रेसचा संबंध आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठीच मी ही निवडणूक लढण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
यामध्ये 9,100 प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करताना मात्र गांधी कुटुंबीयांतील एकही सदस्य मुख्यालयात उपस्थित नव्हता.