महिला कुस्तापटूंसाठी ममता बॅनर्जींनीही ठोकला शड्डू; सरकारला एकाच वाक्यात दिला इशारा…
कुस्तीपटूंना साथ न देणाऱ्या खेळाडूंविरोधातही निदर्शने सुरू करण्यात आली आहेत. कुस्तीपटूंना पाठिंबा न दिल्याने नाराजी व्यक्त करत युवक काँग्रेसने बुधवारी सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्याबाहेर पोस्टर लावून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे आता महिला कुस्तीपटूंच्या बाजूने आता आणखी एक बुलंज आवाज उभा राहिल्याने या आंदोलनाला धार येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मु्ख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने कोलकात्यात मोर्चा काढून महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये ममता बॅनर्जीही सहभागी झाल्या होत्या. या मोर्चामुळे कुस्तीपटूंसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या ममता बॅनर्जी या देशातील पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
या मोर्चादरम्यान ममता यांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी हे भाजपचे नेते असल्याने त्यांना अटक केली जात नाही. मात्र ही घटना देशासाठी शरमेची गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे आता ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी हा आमचा लढा अविरत सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ब्रिजभूषणच्या अटकेच्या मागणीसाठी आमचा हे आंदोलन आम्ही हे सुरुच ठेवणार असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्हाला आमच्या देशातीला आणि आमच्या मातीतील खेळाडूंचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता पुढची तयारी सुरु केली आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही महिला कुस्तीपटूंशी बोललो असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यामुळे आता टीएमसीकडून कुस्तीपटूंना न्याय मिळण्यासाठी कँडल मार्चही काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आता कुस्तीपटूंना साथ न देणाऱ्या खेळाडूंविरोधातही निदर्शने सुरू करण्यात आली आहेत. कुस्तीपटूंना पाठिंबा न दिल्याने नाराजी व्यक्त करत युवक काँग्रेसने बुधवारी सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्याबाहेर पोस्टर लावून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेसने त्याच्या घराबाहेर पोस्टर लावताच मुंबई पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई करून पोस्टर हटवण्यात आले आहे.