Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात मोठे बदल, बाबुल सुप्रियोंचं जोरदार कमबॅक, पार्थ चॅटर्जींमुळे झालेलं डॅमेज कंट्रोल

ईडीच्या कारवाईनंतर पार्थ चॅटर्जी यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचे संकेत दिले होते. 2021 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर ममता यांचा हा पहिलाच मंत्रिमंडळ बदल आहे.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात मोठे बदल, बाबुल सुप्रियोंचं जोरदार कमबॅक, पार्थ चॅटर्जींमुळे झालेलं डॅमेज कंट्रोल
ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात मोठे बदल
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 3:59 PM

कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्या मंत्रिमंडळात बदल केले आहेत. या नव्या मंत्रिमंडळात एकूण 10 नवीन मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनाही मंत्री करण्यात आले आहे. ममता सरकारने हा मंत्रिमंडळ फेरबदल अशा वेळी केला आहे जेव्हा तृणमूल पक्षाचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांचं नाव शिक्षण घोटाळ्यात आालं आहे. तसेच शिक्षक घोटाळ्यात पार्थ आणि त्याची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीं  यांच्या घरावर ईडीकडून छापेवारीही करण्यात आली. त्यानंतर दोघेही सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. ईडीच्या कारवाईनंतर पार्थ चॅटर्जी यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचे संकेत दिले होते. 2021 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर ममता यांचा हा पहिलाच मंत्रिमंडळ बदल आहे.

ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान?

  1. बाबुल सुप्रियो
  2.  स्नेहशिष चक्रवर्ती
  3.  पार्थ भौमिकी
  4. उदयन गुहा
  5. प्रदीब मुझुमदार

स्वतंत्र प्रभार मंत्री

  1. बिप्लब रॉय चौधरी
  2.  बिरबाह हसदा

नवे राज्यमंत्री

  1. तजमुल हुसेन
  2. सत्यजित बर्मन

बाबुल सुप्रियोंचं जोरदार कमबॅक

मंत्रिमंडळ फेरबदलात बाबुल सुप्रियो यांची जागा तयार ही मोठी बाब मानली जात आहे. बाबुल सुप्रियो यांनी भारतीय जनता पक्ष सोडला आणि सप्टेंबर 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एप्रिल 2022 मध्ये, ते विधानसभेची पोटनिवडणूक जिंकून बंगालच्या बालीगुंगे मतदारसंघातून आमदार झाले.

घोटाळ्यानंतर बंगालमध्ये खळबळ

गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या शिक्षण घोटाळ्याने देशाला हादरवून सोडलेलं आहे.  पश्चिम बंगाल मधला शिक्षण घोटाळा हा इतका गाजला आहे की त्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता ही राजकीय गोटातून वर्तवण्यातच येत होती. ईडीने सतत चालवलेल्या धाडसतरानंतर अर्पिता मुखर्जी हिच्या घरून कोट्यावधी रुपयांचं घबाड ईडीच्या हाती लागलं होतं. हा पैसा इतका मोठा होता की मोजायला ईडीला मशीन आणाव्या लागल्या होत्या. तर दुसरीकडे  पार्थ चॅटर्जी यांनी हा पैसा माझा नाही म्हणत हात झटकले होते. मात्र या प्रकरणात त्यांचं नाव समोर येताच तातडीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातून हकालण्यात आलं होतं, तसेच पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आली होती, या कारवाईवर पार्थ चॅटर्जी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणात रोज नवे ट्विस्ट समोर येत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.