Special Report: गोव्यात ‘खेला होबे’ की नुसतीच खळखळ?, ममता बॅनर्जींना संधी किती?; वाचा सविस्तर

पश्चिम बंगालमध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्याकडे कूच केली आहे. (Mamata Banerjee get the key to power in the Goa assembly elections?, read special report)

Special Report: गोव्यात 'खेला होबे' की नुसतीच खळखळ?, ममता बॅनर्जींना संधी किती?; वाचा सविस्तर
Mamata Banerjee
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 8:54 AM

पणजी: पश्चिम बंगालमध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्याकडे कूच केली आहे. आगामी वर्षी गोव्यात विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पक्ष उतरणार आहे. त्यासाठी ममता बॅनर्जींना खेळाडू आणि माजी मुख्यमंत्र्यांचं बळही मिळालं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी गोव्यात हवा निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र, गोव्यात खरोखरच खेला होबे? की ममतादीदींची नुसतीच खळखळ राहणार आहे, याचाच घेतलेला हा आढावा.

तीन दिवस मुक्काम, बाबा, भाई, पात्रोसवर दीदींचा भरोसा वाढेल?

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी या तीन दिवसाच्या गोव्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. गोव्यात किती यश येऊ शकतं याचा अंदाज घेण्यासाठी ममतादीदी आल्या. मात्र, भाजपने बाहेरचा पक्ष म्हणून टीएमसीला हिणवलं. त्यावर पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपही उतरला होता. तेव्हा बंगालमध्ये भाजपही बाहेरचा पक्ष होता. पण आम्ही त्यांना उपरे म्हणून विरोध केला नाही, मग तृणमूलला विरोध का करता? असा सवाल ममता दीदींनी करून भाजपच्या मुद्द्यातील हवाच काढून घेतली. ममतादीदींचा गोव्यात प्रवेश झाला आहे, पण गोव्यातील बाबा, भाई, पात्रोस (बॉस) यांच्यावर ममतादीदींची जादू चालेल का? हा चर्चेचा विषय आहे.

दौरा यशस्वी की अयशस्वी?

ममता बॅनर्जी यांच्या गोव्या दौऱ्याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये मतमतांतरे आहेत. काहींच्या मते हा दौरा यशस्वी झाला आहे. तर काहींच्या मते ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा अपयशी ठरला आहे. ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरला शाई फासली गेली नसती आणि त्यांना काळे झेंडे दाखवले नसते तर ममतादीदी कधी आल्या आणि कधी गेल्या हे कळलं सुद्धा नसतं असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. टेनिसपटू लिएंडर पेस यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानेही ममतादीदींचा हा दौरा चर्चेत राहिल्याचं काही जाणाकारांचं म्हणणं आहे.

टीएमसीचा धोका कुणाला? काँग्रेस की भाजपला?

जाणकारांच्या मते, गोव्यात ममतादीदींची लढाई भाजपविरोधात असली तरी त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या मते खातील आणि पर्यायाने त्याचा फायदा भाजपलाच होणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे नेते आणि गोव्याचे एक माजी मुख्यमंत्री टीएमसीत जाणं, लिएंडर पेस यांचा टीएमसीतील प्रवेश याचा फटका भाजपला बसणार नाही. तर काँग्रेसलाच त्याचा फटका बसणार आहे. गोव्यात काँग्रेसचं संघटन विस्कळीत आहे. तसं पाहिलं तर गोव्यात काँग्रेसकडे अनेक नेते आहेत आणि एकही नेता नाही, अशी काँग्रेसची अवस्था आहे. काँग्रेसमधील या सावळया गोंधळाचा ममतादीदींना फायदा होईल. काँग्रेस आणि टीएमसीत मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपलाच होणार असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

ममतादीदी गोव्याच्या ओवेसी ठरणार?

दरम्यान, ममतादीदींच्या गोव्यातील एन्ट्रीने धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे भाजप ऐवजी काँग्रेसलाच मोठा फटका बसणार आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये एमआयएमचे नेते ओवेसी यांनी पुरोगामी पक्षांचं सत्तेचं गणित बिघडवलं होतं. ममतादीदी गोव्यात तीच भूमिका निभावण्याची शक्यता आहे, असं जाणकार सांगतात. त्यामुळे ममतादीदी गोव्याच्या ओवेसी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लिएंडर पेस आणि नफीसा अलीची जादू चालणार?

टेनिसपटू लिएंडर पेस आणि अभिनेत्री निफीसा अली यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. दोघेही गोव्याचे रहिवासी आहेत. दोघांचेही कोलकात्याशी ऋणानुबंध आहेत. त्यांचा जन्मही कोलकात्याचा आहे. विशेष म्हणजे दोघेही कोंकणीपेक्षा फर्राटेदार बंगाली बोलतात. पेस गोव्याचे आहेत. पण त्यांची आई बंगाली आहे. त्यांचे आईवडील गोव्यात राहतात. टेनिस जगतातून संन्यास घेतल्यानंतर ते मुंबईत राहत आहेत.

नफीसा अली दिल्लीत राहते. नफीसा आणि पेसला कोलकात्यात बोलावून त्यांना टीएमसीत प्रवेश दिला गेला असता. पण त्यांना गोव्यात बोलावून प्रवेश दिला गेला. टीएमसीबाबतची वातावरण निर्मिती करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. शिवाय या दोघांनाही गोव्यातून तिकीट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच स्टारप्रचारक म्हणूनही त्यांना गोव्याच्या निवडणुकीत उतरवले जाणार आहे. त्यामुळेच हा पक्षप्रवेश झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या दोघांची जादू चालेलच याची काही शक्यता नसल्याचं सांगितलं जात आहे. गोव्याशी संपर्क नसलेल्या व्यक्तींच्या हाती गोव्याची जनता सत्ता सोपवण्याची चिन्हे कमी असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

काँग्रेसचा उदय आणि ऱ्हास

2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी सर्वाधिक 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र, काँग्रेसमध्ये एक दोन नव्हे तर चार चार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार निघाले. शिवाय काँग्रेस श्रेष्ठींनी सत्तास्थापन करण्यात वेळकाढूपणा केला. त्याची संधी साधत भाजपने जोडतोडचं राजकारण करून गोव्यात आपला मुख्यमंत्री बसवला. पाच वर्षापूर्वी 17 आमदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसकडे सध्या पाचच आमदार उरले आहेत. बाकीच्या आमदारांनी काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसचा अवघ्या पाच वर्षात उदय आणि ऱ्हास झाला. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस भाजपला पुन्हा टक्कर देण्याच्या उमेदीने उतरण्याची चिन्हे तशी कमीच असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

एकीचं बळ हेच भाजपचं फळ

2017मध्ये भाजपला जनतेचा कौल मिळाला नव्हता. तरीही भाजपने सत्ता खेचून आणली. सत्तेसाठी भाजपने जोडतोड केली. मात्र, ही जोडतोड करताना पक्षात फूट पडणार नाही आणि आपले आमदार काँग्रेसच्या गळाला लागणार नाहीत याची काळजी घेतली. त्यामुळेच भाजपला सत्ता राखता आली. त्यामुळे भाजपचं हे एकीचं बळ भाजपला वरदान ठरेल का? हे पाहावं लागणार आहे. शिवाय गोव्याच्या जनेतेने काँग्रेसला कौल दिलेला असतानाही भाजपने सत्ता स्थापन केल्याने गोव्याची जनता यावेळी काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘आप’ आई, बाहर गई

अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने 2017मध्ये गोव्यात दिल्ली मॉडेल लागू करण्याचा दावा केला होता. दिल्लीप्रमाणे गोव्यात 40 पैकी 35 जागा जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, आपचं हे स्वप्नं लवकरच भंगलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत आपला 3 ते 4 टक्केच मते मिळाली होती. त्यावेळी सहा महिने आधी केजरीवाल यांनी गोव्यात मोठी रॅली केली होती. त्यामुळे त्यांना 17 जागा मिळणार असल्याचा अंदाज कौटिल्याच्या सर्व्हेत वर्तवण्यात आला होता. इतर सर्व्हेत आपला तीन ते चार जागा मिळणार असल्याचा दावा केला गेला होता. पण निवडणुकीत आपला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत टीएमसीचा ‘आप’तर होणार नाही ना? असा सवाल केला जात आहे.

संबंधित बातम्या:

बनावट प्रमाणपत्रे दावून वानखेडेंनी नोकरी बळकावली, भीम आर्मीची जात पडताळणी समितीकडे तक्रार

‘केंद्र सरकार आणि मोदींबाबत त्यांना कावीळ झालीय’, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

लखलखत्या सोन्याचा कस, कसोटी ते कॅरोटोमीटर, सोने परीक्षणाच्या पद्धती सांगणारा Special Report!

(Mamata Banerjee get the key to power in the Goa assembly elections?, read special report)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.