Mamata Banerjee : ‘महाराष्ट्र मुकाबला करु शकला नाही, पण इथं बंगालची वाघीण बसलीय’, ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

'महाराष्ट्र मुकाबला करु शकला नाही. बंगाल सरकारही पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, बंगालमध्ये बंगालची वाघीण आहे. तुम्हाला तिच्याशी लढाई करावी लागेल. ती कुणालाही घाबरत नाही'.

Mamata Banerjee : 'महाराष्ट्र मुकाबला करु शकला नाही, पण इथं बंगालची वाघीण बसलीय', ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगालImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:00 PM

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र (Maharashtra) मुकाबला करु शकला नाही. बंगाल सरकारही पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, बंगालमध्ये बंगालची वाघीण आहे. तुम्हाला तिच्याशी लढाई करावी लागेल. ती कुणालाही घाबरत नाही. ती आज काही बोलली नाही म्हणजे ती घाबरली असं लोक समजतात. मात्र ती घाबरलेली नाही, असा इशाराच ममता बॅनर्जी यांनी भाजप नेतृत्वाला दिलाय. बॅनर्जी यांनी सोमवारी शिक्षक भरती घोटाळ्याबाबत (Teacher recruitment scam) मौन सोडलं आणि आपण अन्याय सहन करणार नाही, असं त्या म्हणाल्या.

‘पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही’

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, योग्य वेळी सत्याचा विचार व्हावा अशी माझी इच्छा आहे. दोषी ठरल्यास जन्मठेपेची शिक्षा व्हायलाही हरकत नाही. पण ज्या प्रकारे पैसे शोधण्यासाठी महिलेच्या घरावर चिखलफेक सुरु आहे. मी राजकारण केलं नसतं तर जीभ छाटली असती. एजन्सीचा दुरुपयोग करा, पण पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही. त्या महिलेशी पक्षाचा आणि सरकारचा काही संबंध नाही. बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालतो. त्यामुळे या प्रकरणाचाही तीन महिन्यात विचार व्हावा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केलीय.

‘लक्षात घ्या की जखमी वाघीण अधिक भयंकर बनते’

या प्रकारे आपला अपमान होणार असेल तर लक्षात घ्या की जखमी वाघीण अधिक भयंकर बनते. 2021 च्या निवडणुकीत पाय तोडले होते. जर मान खाली घालायची असेल तर सर्वसामान्य जनतेसमोर झुकू. जर कुणी मीडिया ट्रायल करेल, तर कृपया आगीशी खेळू नका. माझ्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु नका. तर तुम्ही मला स्पर्श कराल तर मला माहिती आहे की बोल्ड आऊट कसं करायचं, अशा शब्दात बॅनर्जी यांनी भाजपला इशारा दिलाय.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.