प्रेम वेडं असतं? नवरा आणि 9 महिन्यांच्या मुलीला सोडून निघाली प्रियकराच्या शोधात
Instagram वरचं प्रेम जोमात, बायको नवरा मुलीला सोडून घरातून गेली! अजब लव्ह स्टोरी ऐकून सगळेच कोमात
बिहार : एका अजब प्रेमाची गजब गोष्ट नुकतीच समोर आली. प्रेमविवाह केल्यानंतरही एक तरुणी आपल्या जुन्या प्रियकरासोबत नुकतीच फरार झाली होती. त्यानंतर चक्क पतीने पत्नीचं प्रियकरासोबत लग्न लावून दिलं होतं. ही घटना घडून अवघे काही दिवसच झालेत. आणि आता आणखी एक अजब घटना समोर आलीय. बिहारच्या जमुई भागातील एका विवाहितेची इन्स्टाग्रामवरुन एका तरुणासोबत ओळख झाली. पुढे जाऊन ती त्याच्या प्रेमातही पडली. या विवाहितेला एक 9 महिन्यांची मुलगीही आहे. नवरा आणि मुलगी यांचा विसर पडून ही महिला चक्क आपल्या इन्स्टाग्रामवरील प्रियकराला शोधण्यासाठी घर सोडून गेली.
इन्स्टाग्रामवर या महिलेची ओळख भागलपूर येथील एका युवकासोबत झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही एकमेकांना सोबत जगण्या-मरण्याची वचनं दिली.
ही महिला विवाहित असून ती 9 महिन्यांच्या एका चिमुकल्या मुलीची आईदेखील होती. पण प्रेमात आकंठ बुडालेल्या या महिलेला कशाचंच भान राहिलं नव्हतं.
नवरा आणि मुलीला सोडून ही महिला आपल्या प्रियकराच्या शोधात घराबाहेर पडली. प्रियकराच्या घरीही पोहोचली. पण घरी गेल्यानंतर अजबच घटना घडली.
प्रियकराच्या घरातल्यांनी मोना नावाच्या या महिलेला पोलीसात पाठवून दिलं. तिच्या प्रियकराचं नाव रोशन मंडल असून आम्हा दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे, आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत, असं ती पोलिसांना सांगू लागली.
मोना नावाच्या या महिलेनं पोलिसांना सांगितलं की रोशन सोबत एक वर्षापूर्वी तिची भेट इन्स्टाग्रामवर ओळख झाली. नंतर मैत्री केली. इन्स्टाग्रामवर एकमेकांशी खूप चॅट केलं. मग एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले आणि मग वारंवार आम्ही व्हिडीओ कॉलवर एकमेकांशी बोलायचे.
जेव्हा नवऱ्याला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने मोनाला मारहाण केली. संतापलेल्या मोनाने नवऱ्याचं घर आणि 9 महिन्यांची मुलगी यांना अलविदा केला आणि प्रियकराच्या घरी पोहोचली. पण तिथे मोनाचा प्रियकर रोशनच्या घरातल्यांनी तिला पोलिसांत पाठवून दिलं.
पोलिसांत आल्यानंतर मोनाला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तिला पुन्हा आपल्या पतीच्या घरी पाठवलं गेलं.जातानाही तिने आपलं मनातलं स्पष्टपणे सांगून टाकलं. मी पतीच्या घरी जात असली, तरी माझं प्रेम रोशनवर आहे. विवाहित मोनाचा प्रियकर असलेला रोशन हा एका आयटीआय कॉलेजचा विद्यार्थी आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळेच चकीत झालेत.