Supreme Court : डॉक्टरांना संरक्षण द्या; मेडिकल असोसिएशनचे सुप्रीम कोर्टाला साकडे

सार्वजनिक सेवेच्या कारणास्तव मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची व्यवस्था सरकारला देण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशीही मागणी केली आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूमुळे ही याचिका करण्यात आली आहे. संबंधित महिला डॉक्टर तिच्या रुग्णाच्या कुटुंबाकडून होणाऱ्या छळाचा “बळी” पडली, असा दावा असोसिएशनने केला आहे.

Supreme Court : डॉक्टरांना संरक्षण द्या; मेडिकल असोसिएशनचे सुप्रीम कोर्टाला साकडे
supreme courtImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 1:01 AM

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात रुग्णसेवेसाठी झटलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत डॉक्टरांना जबाबदार धरण्याचे सत्र सुरू झाले आहे. याकडे लक्ष वेधत मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)त धाव घेतली आहे. देशभरातील डॉक्टरांना संरक्षण (Security) द्या, रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत सरकारला निर्देश द्या, असे साकडे सर्वोच्च न्यायालयाला घालण्यात आले आहे. राजस्थानातील प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. असोसिएशनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतेय, याकडे आता देशभरातील डॉक्टरांचे लक्ष लागले आहे. (Medical Association seeks Supreme Court protection of doctors)

राजस्थानमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरची आत्महत्या

राजस्थानमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या तरुण डॉक्टरने नैराश्येतून आत्महत्या केली. याबाबतीत रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरला जबाबदार धरले होते. त्यामुळे त्याचा हकनाक बळी गेल्याचे म्हणणे मेडिकल असोसिएशनने याचिकेतून मांडले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून डॉक्टरांना रूग्णांच्या व्यथित नातेवाईकांकडून संरक्षण द्यावे, अशी विनंती असोसिएशनने केली आहे. डॉक्टरांवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप होत असतात. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून सतत धमक्या दिल्या जात असतात. अशा परिस्थितीत उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या तात्काळ संरक्षणासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची नितांत गरज आहे, असेही याचिकेत नमूद केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने ही याचिका दाखल केली आहे.

डॉक्टरांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी

सार्वजनिक सेवेच्या कारणास्तव मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची व्यवस्था सरकारला देण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशीही मागणी केली आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूमुळे ही याचिका करण्यात आली आहे. संबंधित महिला डॉक्टर तिच्या रुग्णाच्या कुटुंबाकडून होणाऱ्या छळाचा “बळी” पडली, असा दावा असोसिएशनने केला आहे. देशभरातील डॉक्टरांना सतत होणाऱ्या मारहाणीमुळे त्वरित जनहित याचिकेवर सुनावणी करणे आवश्यक आहे,” असा युक्तिवाद याचिकाकर्त्या मेडिकल असोसिएशनचे वकील शशांक देव सुधी यांनी केला आहे. राजस्थानमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.

देशभरात COVID-19 विषाणूच्या व्यापक प्रसारादरम्यान डॉक्टरांनी कोरोना योद्धा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या मानवतावादी सेवांना जगभरात समाजातील सर्व घटकांनी दाद दिली आहे. याकडेही मेडिकल असोसिएशनने याचिकेतून लक्ष वेधले आहे. वैद्यकीय निष्काळजीपणाची प्रकरणे हाताळण्यासाठी देशभरातील पोलिस ठाण्यांमध्ये डिजिटली सुसज्ज वैद्यकीय-कायदेशीर सेल स्थापन करण्यात यावीत, यासाठी न्यायालयाने सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असेही साकडे याचिकेतून घालण्यात आले आहे. (Medical Association seeks Supreme Court protection of doctors)

इतर बातम्या

Kashmir Murder : कश्मीरात दहशतवाद्यांचा हैदोस सुरूच; सरपंचाची गोळ्या झाडून केली हत्या

VIDEO | नोकरी गेली म्हणून थेट मेट्रो स्टेशनवर गेली आणि…; पुढे काय झालं ते धक्कादायक होतं, कारण तिला बोलताच येत नव्हतं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.