कोरोना लढाईत MEIL चं मोठं योगदान, आधी ऑक्सिजन, आता तब्बल 3000 बेडचं कोव्हिड रुग्णालय

मेघा इंजिनिअरिंगने तामिळनाडूमध्ये 3 हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारलं आहे.

कोरोना लढाईत MEIL चं मोठं योगदान, आधी ऑक्सिजन, आता तब्बल 3000 बेडचं कोव्हिड रुग्णालय
MEIL कडून तामिळनाडून 3 हजार बेड क्षमतेच्या कोविड सेंटरची उभारणी
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 2:21 PM

चेन्नई : देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने ( Megha Engineering & Infrastructures Limited) कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठा वाटा उचलला आहे. मेघा इंजिनिअरिंगने तामिळनाडूमध्ये 3 हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारलं आहे. यापूर्वीही MEILने ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, थेट थायलंडवरुन थायलंडमधून अद्ययावत ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर मागवले. त्यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा 3 राज्यांमधील रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य झालं. (MEIL Establishes more than 3000 beds covid center in Tamilnadu)

मेघा इंजिनिअरिंगचा पसारा जगभरात 20 देशांमध्ये पसरला आहे. हैदराबादस्थित असलेल्या या कंपनीने केवळ तेलंगाना, आंध्र प्रदेशातच नाही तर आता तामिळनाडूमध्येही मोठी मदत केली आहे. कंपनी आता तामिळनाडूत 3 हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारत आहे. त्यापैकी 660 बेड कार्यरत झाले आहेत. याचा फायदा तामिळनाडूतील प्रमुख शहर चेन्नई, मदुरैसह परिसरातील तालुक्यांना होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे केवळ 72 तासात 500 ऑक्सिजन बेड उभा करुन रुग्णसेवा सुरु केली आहे.

मोफत उपचार

तामिळनाडूत उभं राहात असलेल्या या रुग्णालयात राज्य सरकारकडून मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी तामिळनाडू सरकारसह क्रेडाय जि. रियल्टर्स यासारख्या कंपन्यांनीही सहभाग घेतला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या देखरेखीखाली हे रुग्णालय उभं राहत आहे.

चेन्नईत 1070 ऑक्सिजन बेड

MEIL कडून तामिळनाडूची राजधानी चेन्नईत विविध रुग्णालयात 1070 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जात आहे. यापैकी 600 बेडची व्यवस्था झाली आहे. तर भविष्यात 3000 ऑक्सिजन बेडची निर्मिती MEIL कडून केली जाणार आहे.

MEIL ला क्रेडाय, जि. रियल्टर्सची साथ

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या या लढाईत MEIL ला क्रेडाय, जि रियल्टर्स यांची साथ मिळाली. या तिन्ही कंपन्यांनी मधुरैच्या सरकारी रुग्णालयात 72 तासात 200 ऑक्सिजन बेडची निर्मिती केली. 21 मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी त्याचं उद्घाटनही केलं. आणखी 300 बेडची निर्मिती केली जात आहे.

MEIL कडून ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य

देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने  रुग्णालयांमधील ऑक्सिजनची तुटवड्याचा प्रश्न सोडमवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. यानुसार कंपनीने थेट वैद्यकीय वापरासाठीच्या लिक्विड ऑक्सिजनचा मोफत पुरवठा करण्यासाठी थायलंडमधून अद्ययावत ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर मागवले आहेत (Cryogenic tanks from Bangkok Thailand). यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा 3 राज्यांमधील रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य होणार आहे.

संबंधित बातम्या :

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, ‘या’ राज्यांना मोफत ऑक्सिजन पुरवणार

MEIL ची स्वदेशी प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत ऑइल ड्रिलिंग रिग्जची निर्मिती, 4 किलोमीटर खोल तेल विहीर काढण्याची क्षमता

MEIL Establishes more than 3000 beds covid center in Tamilnadu

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.