Metro Man E Sreedharan | मेट्रोमॅन ई. श्रीधरन भाजपमध्ये जाणार, विजय यात्रेदरम्यान प्रवेश करणार

मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे ई.श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. Metro Man E Sreedharan BJP

Metro Man E Sreedharan |  मेट्रोमॅन ई. श्रीधरन भाजपमध्ये जाणार, विजय यात्रेदरम्यान प्रवेश करणार
मेट्रोमॅन ई श्रीधरन
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 12:53 PM

तिरुअनंतपुरम : भाजपकडून विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदारपणे करण्यात येत आहे. मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे ई.श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केरळमध्ये भाजपकडून 21 फेब्रुवारीला विजय यात्रा काढण्यात येणार आहे. त्या यात्रेमध्ये ई श्रीधरन राजकीय प्रवासाला सुरुवात करतील. भाजपचे केरळ प्रदेशाध्यश्र के सुरेंद्रन यांनी ही माहिती दिली. (Metro Man E Sreedharan to Join BJP on 21 February said by Kerala BJP chief K Surendran)

56 वर्षांची कारकीर्द

ई. श्रीधरन यांचं पूर्ण नाव इलाट्टुवलापील श्रीधरन आहे. सध्या त्यांचं वय 89 वर्षे असून त्यांना 58 वर्षांचा धोरण ठरवणे, शहर नियोजन याचा अनुभव आहेत. भारतील मेट्रो प्रकल्प यासाठी त्यांनी देशातील विविध शहरांमध्ये आणि परदेशातील प्रवास केला आहे. श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्प, रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल याबद्दल केलेल्या कामासाठी मेट्रोमॅन म्हटलं जाते.

विविध पुरस्कारांनी सन्मानित

ई.श्रीधरन यांना भारत सरकारनं त्यांच्या कामासाठी 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केले आहे. फ्रान्स सरकारनं देखील श्रीधरन यांना 2005 मध्ये पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तर जपानने देखील त्यांना 2013 मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्कार दिला आहे.

2017 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी नाव चर्चेत

मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून माझा राष्ट्रपती पदासाठी विचार होणार नाही. राष्ट्रपती पदासाठी नाव चर्चेत या माध्यमांनी दिलेल्या बातम्या होत्या, असं म्हटलं होते. जरी राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला तरी वयाचा विचार करुन नकार देईन, असंही ते म्हणाले होते.

दिल्ली मेट्रो ते कोची मध्ये काम

ई.श्रीधरन 2019 मध्ये कोची मेट्रोचे प्रमुख म्हणून काम करत होते. कोची मेट्रोचा प्रकल्प 24 किलो मीटरचा आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या लखनऊ, कानपूर आणि मीरत मेट्रो प्रकल्पासाठी ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक सेवेतील प्रकल्प असल्यानं त्याची किंमत लोकांना परवडणारी असावी, अशी भूमिका श्रीधरन यांनी घेतली होती.

ई.श्रीधरन यांच्या नेतृत्वात पाम्बन ब्रीजची पुनर्बांधणी करण्यात आली होती. त्यावेळी ते दक्षिण रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांचं वय 32 वर्ष होते. अवघ्या 46 दिवसामध्ये ते काम पूर्ण करण्यात आले होते. दिल्ली मेट्रोच्या निर्मितीमध्येही ई.श्रीधरन यांनी नेतृत्व केले होते. कोकण रेल्वेशी देखील ते संबंधित होते.

केरळच्या राजकारणाचा विचार करता तिथे सध्या डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे.तर, काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपनं गेल्या काही वर्षांपासून केरळमध्ये जोर लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना यश आलं नव्हतं. मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला किती फायदा होणार हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज; राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती : जयंत पाटील

Metro Man E Sreedharan to Join BJP on 21 February said by Kerala BJP chief K Surendran

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.