Chandrayaan-3 | गरीबीमध्ये बालपण, वडिल ट्रक ड्रायव्हर…कोण आहे मिशन चांद्रयान-3 मधील वैज्ञानिक सोहन?
Chandrayaan-3 | चांद्रयान-3 मिशनमध्ये सोहनने महत्त्वाची भूमिका बजावलीय. आर्थिक स्थितीला त्याने कधीही आपल्या स्वप्नाच्या आड येऊ दिलं नाही. IIT करुन त्याने इस्रोमध्ये प्रवेश केला.
बंगळुरु : आज समस्त भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना आहे. याच कारण आहे, चांद्रयान-3 च यश. चांद्रयान-3 ने बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. या संपूर्ण चाद्रयान मिशनमध्ये शेवटच्या 17 मिनिटांचा प्रवास सोपा नव्हता. हाच मिशनमधील सर्वात अवघड टप्पा होता. पण इस्रोच्या वैज्ञानिकंनी कमाल केली. त्यांच्या अचूक नियोजनामुळे चांद्रयान-3 ने चंद्रावर आरामात सॉफ्ट लँडिंग केलं. मिशन चांद्रयानच्या या यशामध्ये झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातून येणाऱ्या सोहन यादवचही महत्त्वाच योगदान आहे. त्यालाही या यशाच श्रेय जातं.
सोहनचे वडिल ट्रक ड्रायव्हर आणि आई गृहिणी आहे. 4 भावंडांमध्ये सोहन तीन नंबर. त्याच बालपण गरीबीत गेलं. पण सोहनमध्ये एक जिद्द होती. काहीतरी करुन दाखवायच हे त्याने मनाशी ठरवलं होतं.
इस्रोमध्ये कसा मिळवला प्रवेश?
गावातील सरस्वती शिशु विद्या मंदिरमध्ये त्याने पाचवीपर्यंतच शिक्षण घेतलं. त्यानंतर नवोदय विद्यालयातून SSC पर्यंतच शिक्षण केलं. बरियातूच्या DAV मधून 12 वी पास झाला. सोहन आधीपासूनच अभ्यासात हुशार होता. शिकून मोठं व्हायच, हे त्याच स्वप्न होतं. आर्थिक स्थितीला त्याने कधीही आपल्या स्वप्नाच्या आड येऊ दिलं नाही. IIT करुन त्याने इस्रोमध्ये प्रवेश केला. वयाच्या 21 व्या वर्षी तो इस्रोमध्ये दाखल झाला.
आईने धरलेला उपवास
कठोर मेहनत आणि परिश्रम करुन सोहनने चांद्रयान-2 च्या टीममध्ये स्थान मिळवलं. हे मिशन अखरेच्या क्षणी फसलं. मात्र, तरीही चांद्रयान-3 च्या टीममध्ये सोहनचा समावेश करण्यात आला. “खूप कठीण परिस्थिती माझ्या मुलाने शिक्षण घेतलय. आज त्याच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश मिळालं. चांद्रयान-3 च लँडिंग होत नाही, तो पर्यंत मी उपवास धरला होता” असं सोहनची आई देवकी देवी यांनी सांगितलं. वडिल शिवशंकर ट्रक ड्रायव्हर
आज आपल्या मुलाला जे प्रेम मिळतय, त्याच कौतुक होतय हे पाहून देवकी देवी यांचा ऊर अभिमानाने भरुन आलाय. सोहनचे वडिल शिवशंकर एक ड्रायव्हर आहेत. त्यांची फार कमाई नव्हती. मुलाची चिकाटी पाहून त्यांनी घर खर्चात कपात केली, मुलाला शिकवलं. आज मुलाच्या यशाने वडिलांचा ऊर अभिमानाने भरुन आलाय. सोहनच्या मेहनतीमुळे आज घरची परिस्थिती सुधारलीय.