Ajit Pawar: अजित पवार यांना मित्र पक्षाकडूनच धक्का, या राज्यात भाजपकडून राष्ट्रवादीचा संपूर्ण सफाया

Ajit Pawr NCP news : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंडमध्ये कमलेश सिंह प्रदेशाध्यक्ष आहेत. ते झारखंडमधील अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. आता त्यांनी अजित पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar: अजित पवार यांना मित्र पक्षाकडूनच धक्का, या राज्यात भाजपकडून राष्ट्रवादीचा संपूर्ण सफाया
ajit pawar
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 12:02 PM

Ajit Pawr NCP : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार अस्तित्वात आहे. त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक हे तिन्ही पक्ष एकत्र लढवणार आहे. त्यासाठी जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. झारखंडमधे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण सफाया भाजपकडून होत आहे. झारखंडमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार आहे. ते आमदार आता अजित पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये दाखल होत आहे.

प्रदेशध्यक्ष अन् आमदार भाजपमध्ये

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंडमध्ये कमलेश सिंह प्रदेशाध्यक्ष आहेत. ते झारखंडमधील अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. आता त्यांनी अजित पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. कमलेश सिंह येत्या 3 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कमलेश सिंह हे हुसेनाबाद मतदार संघाचे आमदार आहे. ते पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते. त्यामुळे राज्यात पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ते झारखंड प्रदेशाध्यक्ष आहेत.

भाजपकडूनच राष्ट्रवादीचा संपूर्ण सफाया

वर्षभरापूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपशी घरोबा केला. त्यानंतर अजित पवार यांना पक्ष आणि पक्ष चिन्ह मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयास शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेर नागालँडमध्ये आमदार आहेत. नागालँडमध्ये 7 आमदार आणि संसदेत 3 खासदार आहेत. झारखंडमध्ये असलेला एकमेव आमदार पक्षातून जात असल्याने या राज्यात राष्ट्रवादीचा संपूर्ण सफाया होत आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, झारखंडमधील आमदार कमलेश सिंह भाजपमध्ये दाखल होत असल्याबाबत महाराष्ट्रातील अजित पवार गटातील कोणत्याही नेत्याची प्रतिक्रिया अद्याप आली नाही. परंतु या घडामोडीमुळे विरोधक पुन्हा भाजपवर हल्ला करणार आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.