Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारमधील 4 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामा, कोणत्या मंत्र्यांचा समावेश?
Modi Cabinet Reshuffle: नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला जात आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज सांयकाळी होणार आहे. नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असेल. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगारमंत्री संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. (Modi Cabinet reshuffle four minister resign before expansion including Sadanad Gowda Ramesh Pokhariyal Nishank Santosh Gangwar and debashree chowdhury)
कुणी कुणी दिले राजीनामे?
नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला जात आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये केंद्रीय रासायनिक आणि खते मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि देबाश्री चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशकं यांनी प्रकृतीच्या कारणामुळं राजीनामा दिला असल्याचं कळतं आहे.
पश्चिम बंगालच्या खासदार देबोश्री चौधरी यांनी देखील राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा मागितला. पश्चिम बंगालमध्ये आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रासायनिक आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी देखील राजीनामा दिला आहे. कर्नाटकाची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. कर्नाटकातील भाजपमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सदानंद गौडा यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विषयी काही भाजप आमदारांनी नाराजी दर्शवली होती.
कामगारमंत्र्यांचा राजीनामा उत्तर प्रदेशातील नव्या चेहऱ्यांना संधी
कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी देखील राजीनामा दिला आहे. संतोष गंगवार उत्तर प्रदेशातील बरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपाल पदी नियुक्ती
केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना देखील एक प्रकारे मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण
भारती पवार यांचा मोदी टीममध्ये समावेश होणार?; पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा
(Modi Cabinet reshuffle four minister resign before expansion including Sadanad Gowda Ramesh Pokhariyal Nishank Santosh Gangwar and Debashree Chowdhury)