15 ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या नव्या मंत्र्यांना कोणत्या 5 सुचना? वाचा सविस्तर

मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदींनी नव्या मंत्र्यांना अनेक सूचना आणि सल्ले दिले आहेत. त्यात गरज नसताना माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा, अनावश्यक वक्तव्ये टाळा, अशा सूचनांचा समावेश आहे.

15 ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या नव्या मंत्र्यांना कोणत्या 5 सुचना? वाचा सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 11:38 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पडला. त्यानंतर लगेच खातेवाटपही जाहीर झालं. आज नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचीत केंद्रीय कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची बैठक घेतली. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदींनी नव्या मंत्र्यांना अनेक सूचना आणि सल्ले दिले आहेत. त्यात गरज नसताना माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा, अनावश्यक वक्तव्ये टाळा, अशा सूचनांचा समावेश आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी या मंत्र्यांना 5 महत्वाच्या सूचना केल्या आहेत. (PM Narendra Modi’s 5 important suggestions to the new ministers)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 महत्वाच्या सूचना

1. 15 ऑगस्टपर्यंत नवनिर्वाचित मंत्र्यांनी दिल्ली सोडू नये. 2. महिन्याभरात म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत मंत्रालयात हजर रहा. 3. मिळालेल्या मंत्रालयाचं कामकाज समजून घ्या. 4. अनावश्यक वक्तव्य नकोत. 5. जल्लोष मर्यादीत राहील याची काळजी घ्या.

‘त्या’ 12 मंत्र्यांना का हटवलं? मोदींनी सांगितलं कारण

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांच्यासारख्या दिग्गजांसह 12 विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय. या मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीमुळे काढण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. मात्र मंत्रिपदावरुन बाजूला करण्यात आलेल्या मंत्र्यांना त्यांची कामगिरी किंवा क्षमतेमुळे डच्चू देण्यात आलेला नाही. मंत्र्यांच्या राजीनाम्याचा त्यांच्या कार्यक्षमतेशी संबंध नाही. तर जुन्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना दबाबदारी देण्यात आली आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. तुम्ही ज्यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. माध्यमांना गरज नसताना प्रतिक्रिया देणं किंका आक्षेपार्ह विधानं टाळा, अशी सूचनाही पंतप्रधानांनी या मंत्र्यांना केलीय.

राज्यमंत्र्यांनाही महत्वाच्या सूचना

पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत राज्यमंत्र्यांनाही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. राज्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांसोबत मिळून काम करावं. असं काम ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकेल. तुम्हाला देशासाठी काम करायचं आहे.

कृषी आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय

मंत्रिपरिषदेच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी एक ट्वीट करुन कृषी आणि शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सशक्त करण्यासाठी कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचा उपयोगासह कर्जावर व्याजात सूट देण्याच्या व्यवस्थेबाबतही माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या :

चर्चा दाजीच्या राजीनाम्याची, लागली लॉटरी, दानवे थेट रेल्वे राज्य मंत्री!

Modi cabinet expansion: मोदींचा टॉप फोर जैसे थे, शाहांकडे सहकार, राणेंकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, एका क्लिकवर वाचा संपूर्ण खातेवाटप

PM Narendra Modi’s 5 important suggestions to the new ministers

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.