Modi Cabinet Reshuffle : मोदी कॅबिनेट विस्ताराआधीच धक्क्यावर धक्के, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपाठोपाठ आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनचाही राजीनामा
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असताना डॉ. हर्षवर्धन यांना आरोग्यमंत्रीपदावरुन हटवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, डॉ. हर्षवर्धन यांना दुसरं खातं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय. कोरोना संकटाच्या काळात काही राज्य सरकारांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन वारंवार निशाणा साधला होता. त्यावेळी डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असताना डॉ. हर्षवर्धन यांना आरोग्यमंत्रीपदावरुन हटवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, डॉ. हर्षवर्धन यांना दुसरं खातं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Union Health Minister Dr. Harshvardhan resigns as minister)
मोदी सरकारमधील एकूण 8 विद्यमान मंत्र्यांनी आपल्या खात्याचा राजीनामा दिला आहे. त्यात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, देबोश्री चौधरी, रावसाहेब दानवे पाटील, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, सदानंद गौडा या मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, या नेत्यांना डच्चू मिळतो की दुसरं कुठलं खातं दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. डॉ. हर्षवर्धन यांना मात्र दुसरं खातं दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
43 नेत्यांचा शपथविधी
आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?
केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण लोकसभा खासदारांच्या संख्येच्या 15 टक्के मंत्र्यांचा समावेश असावा, असा नियम आहे. सध्याच्या लोकसभेत 552 खासदार आहेत. त्यानुसार आकडेमोड केल्यास केंद्रीय मंत्रिमंडळात 82 पेक्षा जास्त नेत्यांना घेता येणार नाही. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहेत. त्यामुळे आणखी 29 मंत्र्यांचा नव्याने समावेश करता येईल. उर्वरित नेत्यांच्या समावेशासाठी काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरच रस्ता दाखवला जाईल. भाजपमध्ये संघटनात्मक पदांवर वर्णी लावून त्यांचे पुनर्वसन करता येईल.
नव्या कॅबिनेटची रचना कशी असेल?
1. अनुच्छेद 74 नुसार राष्ट्रपती मंत्रिपरिषदेची स्थापना करतात. 2. मंत्रिपरिषदेच्या सर्वोच्चपदी पंतप्रधान असतात. 3. पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मंत्रिमंडळातील नेत्यांच्या नावाला सहमती देतात. 4. संविधानातील अनुच्छेद 75(1) नुसार, पंतप्रधानांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून केली जाते. 5. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा किंवा नाही, याचे सर्वाधिकार पंतप्रधानांकडे असतात.
संबंधित बातम्या :
Modi Cabinet Expansion: रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रेंचा राजीनामा?; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
Union Health Minister Dr. Harshvardhan resigns as minister