AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack: संतापजनक…, हल्ल्यानंतर भारत पुन्हा घुसेल पाकिस्तानमध्ये, काय असेल मोदींचा पुढचा निर्णय?

Pahalgam Terror Attack: मोदी आणि शहा यांचं दाहशदवादाविरोधात 'झीरो टॉलरेन्स' धोरण, पहलगाम हल्ल्यानंतर भारत पुन्हा घुसेल पाकिस्तानमध्ये, काय असेल मोदींचा पुढचा निर्णय?

Pahalgam Terror Attack: संतापजनक..., हल्ल्यानंतर भारत पुन्हा घुसेल पाकिस्तानमध्ये, काय असेल मोदींचा पुढचा निर्णय?
Follow us
| Updated on: Apr 23, 2025 | 1:06 PM

Pahalgam Terrorist Attack News: पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार ॲक्शनमोडवर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ल्याविरोधात हलचाली सुरु केल्या आहे. नि:शस्त्र आणि असहाय्य पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेची सर्वत्र टीका होत आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन व्हॅलीच्या वरच्या भागात पर्यटक फिरत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांची नावे आणि ठिकाणे विचारली.

घटनेत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पहलगाम आणि पुलवामा हल्ल्यांची तुलना करायची झाली तर दोन्ही हल्ल्यांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

2019 च्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाला होता, तर मंगळवारी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता. अशा परिस्थितीत बालाकोट एअरस्ट्राइकसारखी कारवाई सध्या तरी दिसत नाही. पण मोदी-शहा यांच्या संभाव्य हालचालींचा अंदाज लावणे कठीण आहे.

हे सुद्धा वाचा

2019 प्रमाणे पाकिस्तानात पुन्हा घुसणार भारत.

2019मध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदचा आत्मघाती बॉम्बर आदिल अहमद दार याने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये 40 सैनिक शहीद झाले होते. 1989 नंतर काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात घातक हल्ला होता.

26 फेब्रुवारी 2019 रोजी, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. ज्यामध्ये 300 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला. या कारवाईमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला.

पहलगाम हल्ल्यानंतर बालाकोटसारखा हल्ला करणे सोपं नाही. कारण पहलगाममध्ये पुलवामासारख्या मोठ्या हल्ल्याची नोंद झालेली नाही. पण मोदी आणि शहा यांनी दाहशदवादाविरोधात ‘झीरो टॉलरेन्स’ धोरण स्वीकारलं आहे.

2025 मध्ये पुलवामा हल्ल्याला अनेक वर्ष झाल्यानंतर शाह म्हणाले होते की, दहशतवादाविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले यासारख्या उपाययोजनांद्वारे भारत दहशतवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यास वचनबद्ध आहे. अशा परिस्थितीत, जर मोठा हल्ला झाला तर भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअरस्ट्राईकसारखी पावले उचलू शकतो, जसं बालाकोटमध्ये घडलं आहे.