डिजिटल कौशल्य सुधारण्यासाठी ‘मेटा’सोबत मोदी सरकारचा करार – धर्मेंद्र प्रधान
मोदी सरकारने डिजीटल कौशल्यावर अधिक भर देण्यासाठी मेटा सोबत करार केला आहे. अनेक शिक्षण संस्थानी यासाठी मेटा सोबत सामंजस्य करार केलाय.
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यासाठी अनेक सुधारणा सुरू केल्या आहेत. डिजिटायझेशनचा एक भाग म्हणून अनेक महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नुकतेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE), नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट (NIESBUD) विद्यार्थ्यांना डिजिटल, कौशल्य शिक्षण देण्यासाठी Meta सोबत भागीदारी करणार आहे. मेटा कंपनी आणि भारत सरकारच्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. Meta, NIESBUD, AICTE, CBSE यांच्यात तीन लेटर्स ऑफ इंटेंट (LoI) ची देवाणघेवाण झाली.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे मेटा यांच्या सहकार्याने ‘एज्युकेशन टू एंटरप्रेन्योरशिप: एम्पॉवरिंग स्टुडंट्स, एज्युकेटर्स अँड एंटरप्रेन्युअर्स’ या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
In furtherance to PM @narendramodi ji’s vision of making India a skill capital of the world and empowering our #AmritPeedhi, launched the ‘Education To Entrepreneurship’ partnership— a joint initiative of @EduMinOfIndia, @MSDESkillIndia and @Meta.
Guided by the tenets of NEP,… pic.twitter.com/BctG1Oca49
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) September 4, 2023
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, डिजिटल कौशल्ये तळागाळापर्यंत पोहोचवले जाईल. विद्यार्थी, तरुण, कामगार आणि सूक्ष्म उद्योजक यांना भविष्यात तंत्रज्ञानाशी जोडणारा आणि त्यांना अमृतपीठात रूपांतरित करणारा हा कार्यक्रम गेम चेंजर असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
NEP च्या अनुषंगाने, Meta ची CBSE, AICTE, NUESBUD सह भागीदारी अनंत संधींसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, असे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले. डिजिटल कौशल्यांसह लोकसंख्येचे सक्षमीकरण, सूक्ष्म उद्योजक आणि लहान व्यवसायांना बळकटी दिल्याने रोजगाराच्या संधी वाढतील, असे ही ते म्हणाले. राजीव चंद्रशेखर म्हणाले की, सरकार युवकांना देशाचा कायापालट करण्यासाठी सुसज्ज करण्याचे काम करत आहे. जेणेकरून ते तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.