मोदी जन्मजात ओबीसी नाहीत, राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ; नव्या वादाला तोंड फुटणार?
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा नवा वाद ओढावून घेतला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी जातीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नवी दिल्ली | 8 फेब्रुवारी 2024 : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी पीएम मोदी यांच्या जातीवरुन नवा सवाल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्मजात ओबीसी नव्हते. ते सर्वसामान्य वर्गात जन्मले आहेत. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी आपली जात ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी हे नव वक्तव्य केले आहे. त्यांच्या या नव्या आरोपामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ओडीसा येथून मार्गक्रमण करीत आहे. या यात्रे दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘पीएम मोदी यांचा जन्म ओबीसी वर्गात झाला नव्हता. ते गुजरातमध्ये तेली जातीत जन्माला आले होते. या जाती समुहाला साल 2000 मध्ये भाजपाने ओबीसीचा दर्जा दिला होता. त्यांचा जन्म खुल्या प्रवर्गातील जातीतच झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच जातीय जनगणना होऊ देणार नाहीत. कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नाही, त्यांचा जन्म सवर्ण जातीत झाला आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
येथे एक्स पोस्ट पाहा –
#WATCH | Delhi: On Congress MP Rahul Gandhi’s statement, Union Minister Kaushal Kishore says, “Rahul Gandhi should do a study about the castes first. He keeps on speaking about caste census. He does now know which section the ‘Teli’ community belongs to. They are included in the… pic.twitter.com/0KAnaUayz6
— ANI (@ANI) February 8, 2024
नरेंद्र मोदी ओबीसी जातीत जन्मले नाहीत
मोदी संसदेत म्हणतात ओबीसीला भागीदारीची काय गरज ? मी ओबीसी आहे असे ते नेहमी म्हणतात. परंतू तुम्हाला सर्वात आधी सांगू इच्छीतो की नरेंद्र मोदी ओबीसीत जन्मले नाहीत. मोदीजी तेली जातीत जन्मले होते. तुम्हाला मुर्ख बनवले जात आहे. त्यांच्या जातीला भाजपाने साल 2000 मध्ये ओबीसी वर्गवारीत समाविष्ट केले, आणि संपूर्ण जगाला ते खोटे सांगत आहेत की मी ओबीसीत जन्माला आलो. मोदीजी कधीच ओबीसींची गळाभेट घेत नाहीत. ते कोणत्याही शेतकऱ्याचा हात देखील पकडत नाहीत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
दिवसातून अनेकदा कपडे बदलून, खोटे बोलतात..
आपण जेव्हा जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाची मागणी केली तेव्हा पीएम मोदी यांनी म्हटले की देशात केवळ दोनच जाती आहेत. श्रीमंती आणि गरीबी. जर दोन जाती आहेत. तर तुम्ही कोण आहात ? तुम्ही तर गरीब नाहीत. तुम्ही करोडोचे सुट घालता. दिवसातून अनेकदा कपडे बदलता. आणि नंतर खोटे बोलता की मी ओबीसी वर्गातला माणूस आहे अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केली आहे.
राहुल गांधी यांना काही ज्ञान नाही – केंद्रीय मंत्री कौशल किशोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी ओबीसी संदर्भात टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हटले की राहुल गांधी यांनी आधी जातींचा अभ्यास करायला हवा. त्यांना हे देखील माहीती नाही की तेली जातीचे लोक कोणत्या वर्गात मोडतात. आणि पंतप्रधान त्याच जातीचे आहेत. राहुल गांधी यांच्या देशाबद्दल आणि देशातील समाजाबद्दल काहीही ज्ञान नसल्याचे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हटले आहे.