Modi Speech | “मोदी तेरी कब्र खुदेगी…”, असं आपल्या भाषणात का म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं म्हणणं मांडलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

Modi Speech | मोदी तेरी कब्र खुदेगी..., असं आपल्या भाषणात का म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 6:15 PM

नवी दिल्ली : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. भाषणाच्या सुरुवातीपासून त्यांनी विरोधकांना झोडपण्यास सुरुवात केली. अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 30 वर्षानंतर देशाच्या जनतेने 2014 मध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आणलं. त्यानंतर 2019 मध्येच त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. 2024 लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि भाजपाचं सरकार सत्तेत येईल, असं सांगत विरोधकांना कोपरखळी मारली.”2028 मध्ये जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा देश तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनलेली असेल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“अविश्वास आणि अहंकार त्यांच्या नसानसात बसला आहे. त्यांना जनतेचा विश्वास दिसत नाही. जुनी जाणती लोकं सांगतात की, काही शुभ होणार असतं तेव्हा काही तरी शुभ घटना घडतात. मुलं चांगले कपडे घालतात तेव्हा त्यांना काळा टीका लावला जातो. आज चौफेर देशाचं भलं होत आहे. देशाचा जयजयकार होत आहे. मी तुमचे आभार मानतो की काळे कपडे घालून तुम्ही ते वाचवण्याचं काम केलं.”, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला.

“विरोधक डिक्शनरी खोलून अपशब्द घेऊ आले आहेत. कुठून कुठून शोधून आणले. दिवसरात्र मला वाईट बोलण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांची आवडती घोषणा आहे की, मोदी तेरी कब्र खुदेगी..पण त्यांच्या शिव्या, असंवैधानिक भाषा..मी त्याचं टॉनिक बनवतो.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितलं.

“काही वर्षात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. जेव्हा आम्ही पुढच्या पाच वर्षांबाबत असा दावा करतो तेव्हा जबाबदार विरोधक काय करतात? प्रश्न विचारायला हवा की, कसं करणार? काय योजना आहे. पण ही बाबही मलाच शिकवावी लागते. ते याबाबत सूचनाही देऊ शकले असते. त्याचबरोबर निवडणुकीत जनतेसमोर जाताना आम्ही देशाची अर्थव्यवस्था एक नंबरवर आणू, असा दावा करायला हवं होतं. पण विरोधक असं काहीच करताना दिसत नाहीत. काँग्रेसचे लोकं काय करत आहेत. इतकं वर्षे सत्तेत राहूनही अनुभवहीन वक्तव्य करत आहेत.”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.