एमएमएस कांड प्रकरण आता उच्च न्यायालयात; ‘या’ मागणीने धरला जोर

विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विद्यापीठ प्रशासन आणि पंजाब सरकार अपयशी असल्याचा आरोप उच्च न्यायालयात केला

एमएमएस कांड प्रकरण आता उच्च न्यायालयात; 'या' मागणीने धरला जोर
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 5:26 PM

चंदीगडः मोहाली विद्यापीठातील (Chandigrah University) अंघोळ करतानाचे 60 विद्यार्थिनींचे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) केल्या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर हे प्रकरण आता पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.मोहाली (Mohali) विद्यापीठातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात दाखल केले आहे.

दाखल करण्यात आलेल्या याचिकेत विद्यापीठ प्रशासन आणि पंजाब सरकार विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे विद्यार्थिनीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व प्रकारामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवावा त्यामुळे वास्तव समोर येईल अशीही मागणी करण्यात आली आहे.

मोहालीतील एका खासगी विद्यापीठात आंघोळ करताना विद्यार्थिनींचे व्हिडिओ लीक झाले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या वकिलानी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता लवकरच हायकोर्टात सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विद्यापीठ प्रशासन आणि पंजाब सरकार अपयशी असल्याचा आरोप उच्च न्यायालयात केला आहे.

या याचिकेमध्ये सुरक्षिततेचा दावा करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करुन तरत त्यातील सत्य बाहेर येईल अशीही मागणी केली गेली आहे.

मोहालीच्या खासगी विद्यापीठातील विद्यार्थिनींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची एसआयटी तपासणी केली जात आहे.

वरिष्ठ आयपीएस गुरप्रीत कौर देव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटी कमिटीत सर्व महिला अधिकारी आहेत.

गुरुप्रीत कौर यांच्या मते आतापर्यंत आरोपी विद्यार्थिनी, तिचा प्रियकर आणि अन्य एकाला शिमला येथून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सगळ्या आरोपीपर्यंत एसआयटी पोहचणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून सहा दिवस वर्ग बंद ठेवले गेले आहेत.

त्यामुळे अनेक विद्यार्थिनी विद्यापीठ सोडून आपल्या घरी त्या दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात वसतिगृहाच्या दोन वॉर्डन निलंबित करण्यात आल्या असून इतर कर्मचाऱ्यांची बदली केली गेली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.