AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता संघाचा आयटी सेल, मुस्लिम मोहल्ल्यात शाखा उघडणार; मोहन भागवतांचं मोठं विधान

मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिराचा आज समारोप झाला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं. (Mohan Bhagwat)

आता संघाचा आयटी सेल, मुस्लिम मोहल्ल्यात शाखा उघडणार; मोहन भागवतांचं मोठं विधान
मोहन भागवत यांनी 10 लाख तरुणांना संबोधित केलं
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 6:13 PM

भोपाळ: मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिराचा आज समारोप झाला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं. मुस्लिम मोहल्ल्यांमध्येही संघाच्या शाखा निर्माण करण्यात येणार असल्याचं मोहन भागवत यांनी जाहीर केलं. तसेच आयटी सेल स्थापन करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्येही आपला जम बसविण्याची संघाने तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. (Mohan Bhagwat declared to open RSS branches in muslim communities, sangh to form IT cell)

चित्रकूट येथे 9 जुलैपासून संघाचं चिंतन शिबीर सुरू झालं होतं. हे शिबीर ऑनलाईन होतं. त्याचा आज समारोप करण्यात आला. यावेळी संघात अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले आहेत. आगामी काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे शिबीर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. यावेळी पश्चिम बंगाल आणि मुस्लिम समुदायाला संघाशी जोडून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

बंगालवर स्वारीची तयारी

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली नाही. त्यामुळे आता बंगाल सर करण्यासाठी संघाने रणनीती आखली आहे. यावेळी संघाने पश्चिम बंगालला तीन खंडात विभाजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दक्षिण बंगालचं मुख्यालय कोलकाता, मध्य बंगालचं मुख्यालय वर्धमान जिल्ह्यात तर उत्तर बंगालचं मुख्यालय सिलीगुडी येथे असेल. शिबीराच्या जबाबदाऱ्यांमध्येही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.

भैयाजी जोशी विहिंपचे संपर्क अधिकारी

यावेळी क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांचं मुख्यालय चंदीगडमध्ये असेल. त्याशिवाय भैयाजी जोशी यांच्याकडे संघाकडून विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना विहिंपचे संपर्क अधिकारी करण्यात आलं आहे. डॉक्टर कृष्णा गोपाल यांना विद्या भारतीचे संपर्क अधिकारी करण्यात आले आहे. तर सरकार्यवाहक अरुण कुमार हे संघ आणि भाजप दरम्यान समन्वयक म्हणून काम पाहतील.

संघ आयटी सेल स्थापन करणार

देशभरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये संघाच्या शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संघाशी मुस्लिमांना जोडण्यात येणार आहे. त्याशिवाय संघाने सोशल मीडियावरही अधिक सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय संघाने आयटी सेल उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयआयटी पासआऊट तरुणांना या आयटी सेलमध्ये संधी देण्यात येणार आहे.

पाच दिवसीय शिबीरात अनेक बैठका

9 जुलैपासून 13 जुलैपर्यंत हे शिबीर पार पडलं. एकूण पाच दिवस हे शिबीर चाललं. यावेळी 9 आणि 10 जुलै रोजी क्षेत्र प्रचारकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 आणि 11 जुलै रोजी प्रांत प्रचारकांची बैठक पार पडली. 11 जुलै रोजी क्षेत्र प्रचारक आणि प्रांत प्रचारकांच्या बैठकीत निघालेल्या निष्कर्षांवर चर्चा करण्यात आली. तसेच संघाच्या भविष्यातील रणनीतीवरही चर्चा करण्यात आली. (Mohan Bhagwat declared to open RSS branches in muslim communities, sangh to form IT cell)

संबंधित बातम्या:

आधी शरद पवार, आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना भेटले प्रशांत किशोर; पंजाब निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?

महाविकास आघाडीतील कुरबुरी पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

प्रवीण तू चॅम्पियन, जपान गाजवून ये, साताऱ्याच्या तिरंदाजाला मोदींचा सल्ला, माता-पित्यांना मराठीत म्हणाले,….

(Mohan Bhagwat declared to open RSS branches in muslim communities, sangh to form IT cell)

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.