Chandrayaan 3 : चंद्रावर भूकंप… विक्रम लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या; संशोधनातून क्रांतिकारी माहिती?
भारताने सुरू केलेल्या चांद्रयान मोहिमेला मोठं यश मिळताना दिसत आहे. विक्रम लँडरकडून चंद्रावरील मोठमोठ्या हालचालीचीं माहिती पाठवली जात आहे. त्यामुळे चंद्रावरील रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.
नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली आहे. इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -3 पाठवलं आहे. या मिशनच्या अंतर्गत विक्रम लँडरकडून सातत्याने नवीन संशोधन केलं जात आहे. चंद्राच्या गोलार्धावर विक्रम लँडर सातत्याने नवनवे प्रयोग करत आहे. आता तर विक्रम लँडरने चंद्रावरील नैसर्गिक कंपने किंवा हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. यावरून चंद्रावरही भूकंप होत असल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे आता चंद्रावरील संशोधनाला ऐतिहासिक वळण लागणार आहे. या संशोधनातून क्रांतिकारी माहिती मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
इस्रोने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. विक्रम लँडरमध्ये काही महत्त्वाची उपकरणे लावण्यात आली आहेत. यावरून चंद्राच्या गोलार्धावर होणारी कंपने रेकॉर्ड केली जात आहेत. अशा प्रकारची कंपने रेकॉर्ड करण्यास ही उपकरणे सक्षम आहेत. या उपकरणांनी गुरुवारी चंद्रावरील पृष्ठभागावर सिस्मिक अॅक्टिव्हिटीचा शोध घेतला आहे, असं इस्रोने म्हटलं आहे. ही उपकरणे प्रज्ञान रोव्हर आणि दुसऱ्या पेलोड्समधील हालचाली रेकॉर्ड करण्यात यशस्वी ठरली आहेत.
कंपने रेकॉर्ड
चंद्रावर सिस्मिक अॅक्टिव्हीटीचा शोध घेण्यासाठी पहिले मायक्रो इलेक्ट्रो मॅकेनिकल सिस्टिम बेस्ड उपकरण इस्ट्रूमेंट फॉर द लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी पाठवण्यात आले आहे. या इन्स्ट्रूमेंटने पेलोडने चंद्रावरील पृष्ठभागावर रोव्हर आणि दुसऱ्या पेलोडमध्ये कंपन रेकॉर्ड केलं आहे, अशी माहिती इस्रोने सोशल मीडियावर दिली आहे.
Chandrayaan-3 Mission: In-situ Scientific Experiments
Radio Anatomy of Moon Bound Hypersensitive Ionosphere and Atmosphere – Langmuir Probe (RAMBHA-LP) payload onboard Chandrayaan-3 Lander has made first-ever measurements of the near-surface Lunar plasma environment over the… pic.twitter.com/n8ifIEr83h
— ISRO (@isro) August 31, 2023
आएलएसएने लावला कंपनाचा शोध
या उपकरणाने 26 ऑगस्ट रोजी रेकॉर्डिंग केली आहे. ही रेकॉर्डिंग स्वाभाविक वाटत आहे. तसेच या घटनेच्या स्त्रोताची माहिती घेतली जात असल्याचंही इस्रोने म्हटलं आहे. इस्रोच्या मते आयएलएसएचा उद्देश नैसर्गिक भूकंप, त्याचा प्रभाव आणि कृत्रिम घटना पाहता चंद्राच्या गोलार्धावर होणारी कंपने मोजणे हा आहे.
प्लाझ्मा कणांचाही शोध
इस्रोने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील रिजनवर प्लाझ्मा पार्टिकल्स असल्याची माहिती दिली होती. विक्रम लँडरवर रेडिओ अॅनाटॉमी ऑफ मून बाऊंड हायपरसेन्सिटिव्ह आयननोस्फिअर अँड अॅटमोस्फिअरही असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं होतं. या उपकरणानेच चंद्रावरील प्लाझ्मा कणांचा शोध घेतला होता. सुरुवातीला एकत्रित करण्यात आलेल्या आकडेवारीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर अपेक्षेनुसार प्लाझ्मा किरणं असल्याचं उघड झालं होतं.