Wedding : लग्नघरी मृत्यृचे दररोज टपाल, नवरदेवाच्या घरी दुःखाचे सावट, 5 दिवसांत 31 नातेवाईकांचा मृत्यू

Wedding : राजस्थानमधील या लग्न घरावर अवकाळा पसरली आहे..

Wedding : लग्नघरी मृत्यृचे दररोज टपाल, नवरदेवाच्या घरी दुःखाचे सावट, 5 दिवसांत 31 नातेवाईकांचा मृत्यू
शोककळा पसरली Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 10:17 PM

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूरमध्ये (Jodhpur) नवरीची वाट पाहणाऱ्या नवरदेवाच्या घरावर मृत्यूची सावली पसरली. नवरदेवाच्या घरी दररोज नातेवाईकांचे मृत्यूची वार्ता येऊन धडकत आहे. नवरदेवाच्या दुःखाला तर पारावार उरला नाही. त्यामुळे नवरदेवाच्या घरावर शोककळा पसरली आहे. शेरगढ मधील भूंगरा गावात लग्नसोहळ्यात सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला आणि दोन्ही घरच्या आनंदावर विरजण पडले. या दुर्घटनेतील मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. उपचारादरम्यान आणखी चार वऱ्हाडींचा मृत्यू ओढावला. त्यामुळे मृतकांचा आकडा (Death Toll) 31 वर पोहचला आहे.

जवळपास एक आठवड्यापूर्वी भूंगरा गावात लग्नसोहळ्यात वरात निघण्यापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली. या सिलेंडर स्फोटात नवरदेवाच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यापासून एक दिवसही असा गेला नाही की नातेवाईकाचा मृतदेह आला नसेल.

गुरुवारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार महिलांचा मृत्यू ओढावला. यामध्ये अनंची कंवर, रसाल कंवर, सुगन कंवर आणि धापू कंवर यांचा समावेश आहे. नवरदेवाच्या आप्तेष्टांपैकी अनेक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.  एका दुर्घटनेमुळे गाव दुःखात बुडाले आहे.

हे सुद्धा वाचा

या दुर्घटनेतील नातेवाईकांचा भावना आवेग न बघण्यासारखा आहे. त्यांचा टाहो काळजाला चिर पाडणारा आहे. दरम्यान मृतदेह एका शवागारात ठेवण्यात आले आहे. राजपूत समाजाने मृतकांच्या नातेवाईकांना मिळालेली मदत तोकडी असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी त्यांनी रुग्णालयाबाहेरच आंदोलन सुरु केले आहे.

नवरदेव सुरेंद्र सिंहच्या आई-वडिलांसह या दुर्घटनात एकूण 31 नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. आता लग्न घरावर दुःखाचे सावट पसरले आहे. या घटनेमुळे भूंगरा गावावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी आनंदाचं वातावरण असलेल्या या गावात हुंदक्यांचे आवाज आहेत.

दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षाचे उपनेते आणि पूर्वमंत्री राजेंद्र राठोड यांनी महात्मा गांधी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्या उपचारांची माहिती घेतली. शवागाराबाहेरील आंदोलनात तेही सहभागी झाले. त्यांनी मृतकाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची आणि 20 कोटींचे पॅकेज देण्याची मागणी केली आहे.

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.