‘2 मुलींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप’, न्याय न मिळाल्याने पीडित आई थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक रिंगणात

सध्या केरळसह देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोर लावलेला दिसत आहे.

'2 मुलींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप', न्याय न मिळाल्याने पीडित आई थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक रिंगणात
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 2:28 AM

थिरुअनंतपुरम : सध्या केरळसह देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोर लावलेला दिसत आहे. मात्र, केरळमध्ये भाजपसोबतच बलात्कार आणि नंतर हत्या झालेल्या 2 मुलींच्या आईने दाद मागूनही न्याय न मिळाल्याने थेट मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. पीडित महिलेने मंगळवारी (16 मार्च) धर्मदममधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यांच्या दोन मुलींवर 2017 मध्ये बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर घरातच फाशी घेतलेल्या स्थितीत मृत आढळल्या होत्या. यानंतर वारंवार दाद मागूनही मुलींना न्याय न मिळाल्याचा आरोप पाडित महिलेने केलाय (Mother of rape victim girls announce about contesting assembly election against CM P Vijayan in Keral).

“मला माझ्या मुलींसीठी न्याय हवा आहे. मी तिरुवनंतपुरममध्ये मुख्यमंत्र्यांना भेटले आणि रडले, माझ्या मुलींच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळावी म्हणून विनंती केली. मात्र, त्यांच्याकडून दोषींवर कारवाई झाली नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री विजयन यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. संघ परिवार सोडता मी सर्वांचा पाठिंबा स्वीकारेल.”

2 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सरकारकडून कारवाई न झाल्यानं मुंडण

पीडित मुलींच्या आईने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सरकारकडून कारवाई न झाल्यानं मुंडण केलं होतं. त्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी केरळमध्ये कासरगोड ते तिरुवनंतपुरम अशी निती यात्रा सुरु केलीय. ती यात्रा 4 एप्रिल रोजी संपेल.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात कोण?

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दुसऱ्यांदा निवडून येण्याच्या आशेने धर्मदरमधून अर्ज भरलाय. मात्र, त्यांच्यासमोर भाजपसोबतच इतर पक्ष आणि या पीडित महिलेचं कडवं आव्हान असणार आहे. धर्मदममधून भाजपनं प्रदेशाध्यक्ष म्हणून के पद्मनाभन यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफ आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही.

केरळ सरकारकडून दोन्ही बहिणींच्या मृत्यूची तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय

केपीसीसी अध्यक्ष एम रामचंद्रन यांनी पीडित महिलेने धर्मदममधून निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मत व्यक्त केलंय. केरळ उच्च न्यायालयाने या खटल्याची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिलेय. त्यानंतर एलडीएफ सरकारने दोन्ही बहिणींच्या मृत्यूची तपासणी सीबीआयला देण्याचा निर्णय जानेवारीमध्ये घेतला होता.

कोर्टाचे 6 जानेवारीला हा खटला पुन्हा सुरू करण्याचा आदेश

राज्य सरकार आणि पीडित मुलींच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने 6 जानेवारीला हा खटला पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिले होते. पलक्कड जिल्ह्यातील वलयारमध्ये 13 जानेवारी 2017 ला 13 वर्षांची मुलगी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर 4 मार्चला तिची 9 वर्षांची लहान बहिणही अशाच प्रकारे मृत अवस्थेत आढळली होती.

हेही वाचा :

Kerala Election 2021 : केरळमध्ये काँग्रेसला मोठा झटका, पक्ष नेतृत्वावर आगपाखड करत पीसी चाको यांचा राजीनामा

केरळमध्ये CPIM चा मोठा निर्णय, तरुणांना संधी देण्यासाठी 5 मंत्र्यांसह 25 आमदारांचं तिकिट कापलं

हैदराबादमध्ये भाजपा वाढली, केरळलाही, मुंबईतही सेनेला टक्कर?

व्हिडीओ पाहा :

Mother of rape victim girls announce about contesting assembly election against CM P Vijayan in Keral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.