संसदेत लिव्ह इनवर बंदी घालण्याची मागणी? तुम्ही याच्याशी सहमत आहात का?

लिव्ह-इन रिलेशनशिप समाजात एका आजाराप्रमाणे पसरत आहे. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. संसदेपर्यंत हा मुद्दा उचलण्यात आला एका खासदारांने यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. श्रद्धा पालकर हत्येचा संदर्भ देत यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे.

संसदेत लिव्ह इनवर बंदी घालण्याची मागणी? तुम्ही याच्याशी सहमत आहात का?
live in
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 3:04 PM

नवी दिल्ली : सध्या लिव्ह इनचा ट्रेंड वाढत आहे. प्रौढ मुलगा आणि मुलगी लग्नाच्या बंधनात न अडकताच एकत्र राहू लागतात तेव्हा त्याला लिव्ह-इन म्हणतात. पण या नात्याल लग्नाचे बंधन नसते. अनेक घटना अशा पुढे आल्या आहेत ज्यामुळे देशाला हादरुन गेला आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलाने मुलीचा खून केला अशा घटना वाढत आहेत. श्रद्धा हत्याकांडात देखील हेच समोर आले होते. आफताब सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ती राहत होते. पण दोघांमध्ये काही तरी वाद होतो आणि तो तिचा खून करतो. इतकंच नाही तर तो तिचे तुकडे करुन जंगलात टाकून देतो. अशा या घटनांमुळे प्रेमाच्या विश्वासाला तडा जातो. मग प्रश्न पडतो की लिव्ह इन रिलेशनशिप योग्य आहे का?

लिव्ह इन रिलेशनशिपवरुन संसदेत आता भाजप खासदार धर्मबीर सिंह यांनी याच्याविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी याला रोग म्हटले आहे. लिव्ह इनवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. श्रध्दा वालकर हत्येचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. लिव्ह-इनवर कायदा करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पण याला देखील विरोध होऊ शकतो.

लिव्ह-इन वर खरंच बंदी घालण्याची गरज आहे का?

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आताच्या पिढीला अडल्ट वेब सीरिज पाहण्यात ही मज्जा येते. त्याने कोणतेही बंधन आवडत नाही. इंस्टाग्रामवर वेळ घालवणारी ही पिढी रात्रीच्या पार्ट्या आणि व्यसनात अडकत चालली आहे. पकोडे खाणारी पिढी आता पिझ्झा खात आहे. ट्रेंड सतत बदलत असतो. त्यानुसार माणसाच्या सवयी बदलतात. समाजात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. पाश्चिमात्य गोष्टी भारतात स्थिर होताना दिसत आहे. भारतीय संस्कृतीचा विसर पडताना दिसत आहे.

हरियाणाचे खासदार धरमबीर सिंह यांनी लोकसभेत लिव्ह-इन रिलेशनशिपचा मुद्दा उपस्थित करताना याला गंभीर आजार म्हटले आहे. हा एक ज्वलंत मुद्दा आहे. भारतीय संस्कृतीत लग्नाला एक पवित्र नातं म्हटलं जातं. पण पाश्चात्य संस्कृतीत घटस्फोट होण्याचे प्रमाण अधिक दिसते. इतके वर्ष ते एकाच व्यक्तीसोबत राहू शकत नाहीत असं दिसतं.

भिवानी महेंद्रगडचे भाजप खासदार म्हणाले की सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये आणि पसंती इत्यादी अनेक गोष्टी लक्षात घेऊन विवाह आयोजित केले जातात. कौटुंबिक पार्श्वभूमीलाही प्राधान्य दिले जाते. भारतात, विवाह हा एक पवित्र बंधन मानला जातो जो सात पिढ्यांपर्यंत चालू राहतो. येथे घटस्फोटाचे प्रमाण खूपच कमी आहे. पण अलिकडच्या वर्षांत घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे, मुख्यतः प्रेमविवाहांमुळे. माझी एक सूचना आहे की प्रेमविवाह करताना मुलगा आणि मुलीच्या पालकांची संमती अनिवार्य करावी. भारताच्या मोठ्या भागात एकाच गोत्रात किंवा एकाच गावात विवाह होत नाहीत. प्रेमविवाहामुळे गावात अनेक भांडणे होतात आणि कुटुंबे उद्ध्वस्त होतात, त्यामुळे दोन्ही कुटुंबांची संमती आवश्यक आहे.

‘लिव्ह इन एक आजार’

ते पुढे म्हणाले की, आजकाल समाजात एका नवीन आजाराने जन्म घेतला आहे. वास्तविक हा आजार पाश्चात्य देशांचा आहे. या सामाजिक दुष्कृत्याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणतात. लिव्ह-इन रिलेशनशिप ही अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, लग्नाशिवाय एकत्र राहतात. पाश्चिमात्य देशांमध्ये असे संबंध खूप सामान्य झाले आहेत पण इथेही हे दुष्प्रवृत्ती वेगाने पसरत आहे. त्याचा परिणामही भयानक आहे. नुकतेच श्रद्धा आणि आफताबचे प्रकरण समोर आले होते ज्यात दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. रोज काही ना काही प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे आपली संस्कृती तर नष्ट होत आहेच शिवाय समाजात द्वेष, दुष्टताही पसरत आहे. हीच परिस्थिती राहिली तर एक दिवस आपली संस्कृती मरेल. शेवटी त्यांनी सरकारकडे लवकरात लवकर लिव्ह इन रिलेशनशिपविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे.

सरकारने यात हस्तक्षेप करावा का?

हा मुद्दा खूप गंभीर आहे. खासदाराने व्यक्त केलेली ही चिंता देखील तितकीच महत्त्वाची आहे. श्रध्दासोबत जे घडले ते इतर कोणत्याही मुलीसोबत घडू शकते. त्यामुळे लिव्ह इनवर बंदी घालावी का? असा प्रश्न खरंच उपस्थित होतो. काय बरोबर आणि काय अयोग्य आहे हे या तरुण पिढीला कळत नाही का? बंदीमुळे या घटनांना खरंच आळा बसू शकतो का? की याविरोधात बंडखोरी होऊ शकते. लिव्ह-इनची खरंच गरज आहे का? पाश्चिमात्य देशात पालकांपासून वेगळे राहून पैसे कमवण्याचा ट्रेंड ही हळूहळू भारतात येऊ लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.