“भाजपासारखे पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी पैसा पुरवते” ; कर्नाटकात जाऊन भाजपचा बुरखा टरटरा फाडला
कोणताही पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करू नये हा गेल्या 60 वर्षांचा अलिखित नियम असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
बेळगाव : कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच, महाराष्ट्राती राजकारणही तापले आहे. आता राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपवर आणि शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्नाटक विधानसभेसाठी भाजपविरोधात उभा राहिलेले मराठी उमेदवारांना पराभूत करण्यासाठी पैसा पुरवला जात असल्याची तोफ खासदार संजय राऊत यांनी डागली आहे.
त्यामुळे आता पुन्हा एका मविआ विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा सामना पुन्हा रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे आवाहन करत खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील एकिकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणं हुत्मांचा अपमान असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
तर भाजपासारखे पक्ष महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी पैसा पुरवत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे सीमाभागातील मराठी माणसांशी बेईमानी करत आहेत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावमध्ये येऊन मराठी एकीकरण समितीचा प्रचार करायला हवा तसेच महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी येथे प्रचाराला येवू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीला येथे पाठिंबा दिला पाहिजे, एकीकरण समितीला गरज पडल्यास मी पुन्हा सोबत येणार असल्याचा विश्वासही त्यांनी मए समितीच्या नेत्यांना त्यांनी दिला आहे.
मराठी माणसांनी सीमाभागात आपण एकजुटीनं काम करू व भाजपचा दारूण पराभव होताना येथे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कर्नाटकमध्ये मजबूत होताना दिसत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विरोधकांना आता येथे शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी मराठी माणसांविरोधात येथे प्रचार करू नये असा टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस गटाला लगावला आहे.
कोणताही पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करू नये हा गेल्या 60 वर्षांचा अलिखित नियम असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.