मुकेश अंबानी यांनी दिले आतापर्यतचे सर्वात महागडे गिफ्ट, किंमत ऐकून तुम्हीही म्हणाल ‘मित्र असावा तर असा’
अंबानी आणि मोदी दोघेही वर्गमित्र आहेत. दोघांनी विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून एकत्र शिक्षण घेतले. मुकेश अंबानी रिलायन्समध्ये काम करू लागले तेव्हा त्यांनी मनोजलाही आपल्यासोबत बोलावले.
नवी दिल्ली : आपल्या कंपनीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या एका सहकारी मित्राला रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी प्रचंड महागडी अशी भेटवस्तू दिली आहे. अंबानी यांचा हा मित्र त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कर्मचारी आहे. अंबानी यांच्या सर्वात जवळचा कर्मचारी म्हणून त्यांची ओळख आहे. रिलायन्सला जे काही व्यावसायिक यश मिळाले त्यामागे त्या मित्राचा सहभाग फार मोठा आहे. वर्षानुवर्षे ते कंपनीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने अथकपणे काम करत आहे. केवळ मुकेश अंबानीच नाही तर त्यांची मुले आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी हे सगळे त्यांच्या सूचना पाळतात.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांचा हा उजवा हात म्हणजे त्यांचा मित्र मनोज मोदी. अंबानी आणि मोदी दोघेही वर्गमित्र आहेत. दोघांनी विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून एकत्र शिक्षण घेतले. मुकेश अंबानी रिलायन्समध्ये काम करू लागले तेव्हा त्यांनी मनोजलाही आपल्यासोबत बोलावले. 1980 पासून मनोज मोदी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत काम करत आहेत.
केवळ व्यवसायातच नव्हे तर अंबानी कुटुंबातही मनोज मोदी यांना आदराचे स्थान आहे. स्वतः मुकेश अंबानी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात. अंबानी कुटुंबातील मुलांसाठी मनोज मोदी मार्गदर्शक म्हणून काम करतात. रिलायन्सच्या यशामागे मनोज मोदी याची मेहनत आणि कल्पक बुद्धी असल्याचेही बोलले जाते.
रिलायन्समध्ये एमएम या नावाने सारण परिचित असणारे मनोज मोदी यांचे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष असते. आपल्या याच मित्राच्या कार्याचा गौरव करत मुकेश अंबानी यांनी त्यांना एक अनमोल भेट दिली. अंबानी यांनी मोदी यांच्यासाठी नुकतेच एक घर विकत घेतले आहे.
मुंबईतील सर्वात पॉश एरिया नेपियन्सी रोड येथे मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांच्यासाठी चक्क 22 मजली इमारत खरेदी केली आहे. या इमारतीला त्यांनी ‘वृंदावन’ असे नाव दिले आहे. येथील मालमत्तेचा दर 45,100 रुपये ते 70,600 रुपये प्रति चौरस फूट असा असून ही इमारत 1.7 लाख चौरस फूट क्षेत्रात बांधली आहे. या इमारतीची किंमत 1500 कोटी रुपये आहे.
आपला सर्वात जुना कर्मचारी आणि जिवलग मित्रासाठी मुकेश अंबानी यांनी 22 मजली इमारत खरेदी करून बँक बॅलन्सच नाही तर हृदयही मोठे असल्याचे दाखवून दिले आहे.
सीईओ सारखेच मोदी यांना अधिकार
मनोज मोदी यांच्याकडे रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे संचालकपद आहे. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसणारे मोदी प्रसिद्धीपासून दूर रहातात. हजीरा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, जामनगर रिफायनरी, फर्स्ट टेलिकॉम बिझनेस, रिलायन्स रिटेल आणि 4जी रोलआउट यासारख्या विविध प्रकल्पांशी ते संबंधित असून अंबानी यांनी त्यांना सीईओ इतकेच अधिकार दिले आहेत.