नवी दिल्ली : भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारतातच नाही तर जगातील 20 श्रीमंतांपैकी एक आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये सध्या मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 82 दशलक्ष डॉलर इतकी आहे. त्यांच्या उद्योगाचा, रिलायन्सचा पसारा सर्व जगभर पसरलेला आहे. त्यातच त्यांचे तीनही मुले आता व्यवसायात उतरली आहेत. त्यांचे अनेक उद्योग नव्याने बाजारपेठ काबीज करण्यासाठी सरसावली आहेत. मुकेश अंबानी एक आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्या रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पगार तर आपण विचार करु शकत नाहीत इतके मोठे आहेत. पण त्यांच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का नक्कीच बसेल. एखाद्या दिग्गज कंपनीतील बड्या पदावरील अधिकाऱ्याला जेवढा पगार असेल त्यापेक्षा काकणभर अधिकच पगार मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरला (Mukesh Ambani Driver Salary) असेल.
लाईव्ह मिंटने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, अंबानी कुटुंबाचे सारथ्य करणारा ड्रायव्हर एका खासगी कंपनीच्यामार्फत कामावर येतो. ही खासगी कंपनी या पदासाठी करार करते. पण या ड्रायव्हरला लागलीच नोकरीवर ठेवण्यात येत नाही. त्याला खास प्रशिक्षण देण्यात येते. या ड्रायव्हरला बुलेटप्रुफ कार आणि आलिशान, व्यावसायिक कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच प्रतिकूल परिस्थितीत उद्भवल्यास त्यावेळी काय करावे, याचे प्रशिक्षण देण्यात येते. अंबानी यांच्या ड्रायव्हरला विमा पॉलिसी आणि भत्ते देण्यात येतात.
केवळ ड्रायव्हरच नाही तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड ठेवावे लागतात. त्यांच्या पगारावर हे अभिनेते कोट्यवधी रुपये खर्च करतात. करीना कपूर तिच्या मुलांचे सांभाळ करणाऱ्या आयेला 1.50 लाख रुपये पगार देते. सलमान खान त्याचा बॉडीगार्ड शेरा याला 2 कोटी रुपये पगार देतो. तो गेल्या 20 वर्षांपासून सलमान खान याच्यासोबत आहे. अक्षय कुमार त्याच्या अंगरक्षकाला 1.2 कोटी रुपये, अमिताभ बच्चन त्याच्या अंगरक्षकाला 1.5 कोटी रुपये पगार देतो.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही माणसं तर सेलेब्रिटींच्या आजूबाजूला वावरत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना तेवढा पगार देण्यात येतो. मग मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरला किती पगार मिळत असेल. तर मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार 2 लाख रुपये आहे. दर महिन्याला हा पगार त्याच्या खात्यात जमा होतो. त्यासोबतच त्याला इतर अनेक सवलती आणि सुविधाही मिळतात. लाईव्ह मिंटच्या दाव्यानुसार, त्याला वार्षिक 24 लाख रुपये पगार मिळतो. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा, अधिकाऱ्यापेक्षा हा पगाराचा आकडा जास्त आहे.