AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन : देशातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचे टेंडर खुले

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा गुजरातच्या सुरत ते बिलीमोरा दरम्यान डिसेंबर 2026 मध्ये सुरू होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन : देशातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचे टेंडर खुले
sea-tunnelImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 07, 2023 | 2:43 PM
Share

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरूवातीचे अंडरग्राऊंड स्थानक असलेल्या बीकेसी ते शीळफाटा या 21 किमी बोगद्याच्या बांधकामासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आली आहे. या 21 किमीच्या बोगद्यापैकी 7 किमीचा बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार असून तो देशातील समुद्राखालील पहिला बोगदा ठरणार आहे. सी-2 पॅकेजच्या या कामासाठी दोन कंपन्यांनी निविदा भरली असून मे.अफ्कॉन्स ( M/s Afcons ) इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडोर लिमिटेडने ( NHSRCL ) निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सी-2 पॅकेजसाठी आर्थिक निविदा उघडण्यात आली आहे. दोन कंपन्यांनी निविदा भरली आहे. सर्वात कमी बोली M/s Afcons कंपनीने लावली आहे. तांत्रिक निविदा येत्या 9 फेब्रुवारी रोजी उघडली जाणार आहे.

508 कि.मी. लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे सुरूवातीचे स्थानक बीकेसी येथे भूमिगत स्वरूपात बांधले जाणार जाणार आहे. बीकेसी स्थानक ते शिळफाटापर्यंत 21 किमीचा बोगदा खणण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन ( TBM ) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धत ( NATM ) अशा दोन्ही पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ( पॅकेज सी -2 ) ठाण्याच्या खाडीत ( Interdidal Zone ) समुद्राखाली खणण्यात  येणारा 7 किमीचा बोगदा हा देशातील पहिला समुद्राखाली बोगदा ठरणार आहे.

एकाच बोगद्यातून दोन बुलेट धावणार

बुलेट ट्रेनसाठी खोदण्यात येणारा बोगदा अप आणि डाऊन अशा दोन्ही ट्रॅकसाठी एकच असणार आहे. सी – 2 पॅकेजमध्ये बोगद्याच्या जवळ आसपास 37 ठिकाणावर 39 इक्विपमेंट रूमची निर्मिती केली जाणार आहे. बोगद्यासाठी 13.1  मीटर व्यासाच्या कटर हेड वाल्या टीबीएम मशिनचा वापर केला जाणार आहे. खरे तर शहरातील एमआरटीएस – मेट्रोच्या बोगद्यांसाठी 5-6 मीटर व्यासाच्या कटर हेडचा वापर केला जात असतो.

The tunnel will be a single tube tunnel to accommodate twin track for both-up and down track.

The tunnel will be a single tube tunnel to accommodate twin track for both-up and down track.

पारसिक डोंगराखाली 114  मीटर खोलीचा मार्ग

बोगद्याच्या 16  किमी भागासाठी तीन टनेल बोअरिंग ( TBM ) मशीनचा वापर केला जाणार आणि उर्वरित 5 किमीच्या भागासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत ( NATM ) वापरली जाईल. हा बोगदा जमीनीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खोल असणार आहे.  आणि त्याचा सर्वात खोल भाग शिळफाटाजवळ पारसिक डोंगराच्या खाली 114 मीटर जमीनीखाली असणार आहे. बीकेसी , विक्रोळी आणि सावळीमध्ये अनुक्रमे 36, 56 आणि 39 मीटर खोलीवर तीन शाफ्ट टाकण्यात येणार आहेत. घनसोलीत 42 मीटरचा इंक्लिनेड शाफ्ट आणि शिळफाटामध्ये टनेल पोर्टल एनएटीएममार्फत सुमारे 5 किमी बोगद्याचे काम होणार आहे.

The 7 km (approx.) undersea tunnel at Thane Creek

The 7 km (approx.) undersea tunnel at Thane Creek

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.