AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनिया, प्रियांका की राहुल गांधी…; प्रशांत किशोर यांच्या दृष्टीने सर्वात पॉवरफुल नेता कोण?

Prashant Kishor on Rahul Gandhi Priyanka Gandhi Sonia Gandhi : 'तो' प्रस्ताव काँग्रेसने स्विकारला नाही, अन्यथा आज गांधी घराण्यातील व्यक्ती उत्तरप्रदेशची मुख्यमंत्री असती; प्रशांत किशोर नेमकं काय म्हणाले? राहुल, प्रियांका की सोनिया गांधी? राजकारणाची जाण असलेला नेता कोण? वाचा...

सोनिया, प्रियांका की राहुल गांधी...; प्रशांत किशोर यांच्या दृष्टीने सर्वात पॉवरफुल नेता कोण?
| Updated on: Feb 08, 2024 | 12:52 PM
Share

मुंबई | 08 फेब्रुवारी 2024 : प्रशांत किशोर… राजनितीक रणनितीकार… ज्यांचं नाव घेतलं, की निवडणुका, निवडणुकांचं कॅम्पेनिंग अन् आकड्यांची गणितं डोळ्यासमोर उभी राहतात. भारताच्या राजकारणाची जाण असलेली व्यक्ती म्हणून प्रशांत किशोर यांचं नाव आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वावर प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं. आगामी निवडणुकांच्या हार-जीतवर त्यांनी भाष्य केलं. नीतीश कुमार यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच राजकीय पक्षांचं कॅम्पेनिंग केलं जातं तेव्हा स्टॅटर्जी कशी आखली जाते याबाबतही प्रशांत किशोर बोलते झाले.

जास्त पॉवरफुल नेता कोण?

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यापैकी काँग्रेस पक्षातील कोणता नेता अधिक प्रभावशाली वाटतो, असं प्रशांत किशोर यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यापेक्षा सोनिया गांधी यांचं नेतृत्व जास्त पॉवरफुल वाटतात. इटलीतून येऊल भारत देशाच्या राजकारणाला समजणं. या देशाच्या राजकारणा आपली जागा निर्माण करणं. सोपं नव्हतं. प्रियांका, राहुल यांच्यापेक्षा सोनिया गांधी राजकारणाची जाण असणाऱ्या नेत्या आहेत, असं प्रशांत किशोर म्हणाले.

उत्तर प्रदेशबाबत प्रशांत किशोर म्हणाले…

प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसला एक प्लॅन दिला होता. यात प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशची निवडणूक लढली जावी. प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करावं, असा प्रस्ताव प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिला. आधी या प्लॅनला काँग्रेसच्या नेतृत्वाने मान्य केला. मात्र नंतर त्याला नकार दिला, असं प्रशांत किशोर म्हणाले.

काँग्रेस पुन्हा उभी कशी राहणार?

काँग्रेसला पुन्हा उभं राहायचं असेल तर काय करावं, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा प्रशांत किशोर यांनी महत्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणाले की काँग्रेसला पुन्हा पूर्वपदावर यायचं असेल. पुन्हा देशात सत्ता आणायची असेल तर त्यांना त्यांच्या मूळ विचारसरणी आणि कामाच्या पद्धतीकडे जावं लागेल. काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा ते ज्या पद्धतीने काम करत होते. तसं त्यांना आताही करावं लागेल, असं प्रशांत किशोर म्हणाले.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.