काय चक्क पोपटामुळे लागला खुनाचा शोध अन् आरोपीला झाली शिक्षा

विजय शर्मा आपल्या मुली आणि मुलासोबत फिरोजाबाद येथे लग्नासाठी गेले होते. यावेळी विजय शर्मा यांची पत्नी नीलम आणि त्यांचे वडील आनंद शर्मा घरी होते. ते घरी परत आले तेव्हा त्यांना पत्नी नीलमचा खून झाल्याचे दिसला. मग हा खून केला हे पोपटाने कसे सांगितले...

काय चक्क पोपटामुळे लागला खुनाचा शोध अन् आरोपीला झाली शिक्षा
दुकानाचे शटर तोडून मोबाईलची चोरी
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 11:02 AM

आग्रा: पोपट पाळीव पक्षी चांगलाच माणसाळलेला असतो. पोपटाच्या त्याचा मीठू, मीठू आवाजाची मोहिनी लहान मुलांवर नेहमी असते. संकटाच्या वेळी पोपट मालकाला मदत करतो. जीव वाचवू शकतो. विशेष म्हणजे पोपटाची स्मरणशक्तीही चांगली असते. एखादी गोष्ट त्याला एकदा सांगितली तर तो विसरत नाही, मग तो माणसाचा चेहरा असो किंवा त्याचे नाव. यामुळे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका खुनाचा शोध लागला.  पोपटाच्या साक्षीमुळे आरोपीला तुरुंगात जावे लागले. न्यायालयाने त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना दंड ठोठावला. परंतु महिलेच्या हत्येनंतर सहा महिन्यांनी पोपटही मरण पावला, मात्र मरण्यापूर्वी पोपटाने मारेकऱ्यांचा सुगावा घरातील सदस्यांना दिला.

काय आहे प्रकरण

20 फेब्रुवारी 2014 रोजी आग्रा येथील रहिवासी विजय शर्मा आपल्या मुली आणि मुलासोबत फिरोजाबाद येथे लग्नासाठी गेले होते. यावेळी विजय शर्मा यांची पत्नी नीलम आणि त्यांचे वडील आनंद शर्मा घरी होते. ते घरी परत आले तेव्हा त्यांना पत्नी नीलमचा खून झाल्याचे दिसले. धारदार शस्त्राने तिची हत्या करण्यात आली. घरातील दागिने लंपास करुन ही हत्या झाली होती. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

पोपट झाला उदास

विजय शर्मा यांच्या घरी एक पाळीव पोपट हिरा होता. तो घटनेनंतर उदास राहू लागला. घरच्या व्यक्तींना संशय येऊ लागला. मग त्यांनी पोपटासमोर अनेक जणांची नावे घेतली. त्यांनी विजय शर्मा यांचा भाचा आशु उर्फ ​​आशुतोष गोस्वामी याचे नाव घेतले पोपट जोरजोरात ओरडू लागला. मग त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांसमोर पोपटाने असाच प्रकार केला.

पोलिसांनी आशूला घेतले ताब्यात

पोलिसांनी आशूला ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. त्याने मित्र रोनी मेस्सीसोबत नीलम शर्माचा खून केल्याचे सांगितले. नीलम आशूला मुलाप्रमाणे समजत होती. परंतु त्यानेच तिची हत्या केली.

मुलगी निवेदिताने सांगितले की, पोपट तिची आई नीलमशी सतत बोलत होते. तिच्यासोबत तो जेवण करत होता. आशु हा त्याच्या मावशीचा मुलगा होता, त्यामुळे त्याचे घरी येणे-जाणे होते. घरात ठेवलेल्या रोकड आणि दागिन्यांची माहिती त्याला होती, त्यामुळे त्याने दरोड्याची योजना आखली. त्याने आई नीलम शर्मा यांच्यावर 14 वेळा चाकूने वार केले आणि पाळीव कुत्रा जॅकीवर 9 वेळा वार केले.त्यावेळी घरात पाळीव पोपटही उपस्थित होता. त्यांनी हा संपूर्ण प्रसंग पाहिला होता. मात्र, सहा महिन्यांनी पोपटाचा मृत्यू झाला. न्यायालयाने गुरुवारी आरोपीला जन्मठेप आणि 72 हजार दंडाची शिक्षा सुनावली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.