Murder : दारुचे आमिष दाखवून केली विद्यार्थ्याची हत्या; गाझियाबादमधील धक्कादायक घटना

बाळूने कुशाग्रला दारूचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी बोलावले होते. तो घरी आल्यानंतर पध्दतशीरपणे कुशाग्रच्या हत्येचा कट यशस्वी करण्यात आला. मात्र त्यांचा हा कट पोलिसांच्या कचाट्यात सापडला आणि आरोपींचे पितळ उघडे पडले.

Murder : दारुचे आमिष दाखवून केली विद्यार्थ्याची हत्या; गाझियाबादमधील धक्कादायक घटना
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 12:47 AM

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात एलएलबीचे शिक्षण घेणारा 23 वर्षीय विद्यार्थी विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. कवी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मधुबन बापू धाम कॉलनीत घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशाग्र चौधरी असे मृताचे नाव असून तो गाझियाबादमधील संजय नगर, सेक्टर-23 येथील एका संस्थेत एलएलबीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.

कुशाग्रचे वडील वीरेंद्र सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुशाग्र हा बुधवारी रात्री मोटारसायकल दुरुस्त करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. तेव्हापाहून तो बेपत्ता झाला होता. गाझियाबाद शहराचे पोलिस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशाग्रच्या वडिलांनी बुधवारी रात्री मुलगा घरी न परतल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कुशाग्रचे वडील वीरेंद्र सिंह हे एका बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात कुशाग्रचा शोध सुरु केला होता.

आरोपीच्या कबुलीतून झाला हा धक्कादायक खुलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशाग्र हा योगेंद्र उर्फ ​​बाळू, त्याची पत्नी पूजा आणि पवन नावाच्या आणखी एका व्यक्तीसोबत हापूर रोड टोल येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात दिसला होता. यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली होती. अखेर पोलिसांच्या कारवाईला योग्य दिशा मिळाली आणि पोलिसांनी बाळू व त्याच्या पत्नीला अटक केली. चौकशीत बाळूने कुशाग्रच्या खूनाची कबुली दिली. आपण कुशाग्र चौधरीचा त्याच्या राहत्या घरी लोखंडी रॉडने वार करून खून केला होता.

बाळूने कुशाग्रला दारूचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी बोलावले होते. तो घरी आल्यानंतर पध्दतशीरपणे कुशाग्रच्या हत्येचा कट यशस्वी करण्यात आला. मात्र त्यांचा हा कट पोलिसांच्या कचाट्यात सापडला आणि आरोपींचे पितळ उघडे पडले. या घटनेने परिसरात मात्र प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. अवघ्या 23 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Murder of a student by showing the lure of alcohol, Shocking incident in Ghaziabad)

इतर बातम्या

Cyber Fraud: सावधान! ओमिक्रॉन चाचणीच्या नावाखाली होतेय फसवणूक; सायबर गुन्हेगार झाले सक्रीय

Ichalkaranji Crime : फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.