राम मंदिरासाठी निधी गोळा करणारी मुस्लीम महिला कोण? लोकांकडून जोरदार कौतुक
धर्म नेहमीच माणसांना वेगळं करतो असं नाही. हेच सिद्ध करणारं एक उदाहरण सध्या देशात पाहायला मिळत आहे. एक मुस्लीम महिला अयोध्येतील राम मंदिर उभं करण्यासाठी निधी गोळ करत आहे.
नवी दिल्ली : धर्म नेहमीच माणसांना वेगळं करतो असं नाही. हेच सिद्ध करणारं एक उदाहरण सध्या देशात पाहायला मिळत आहे. एक मुस्लीम महिला अयोध्येतील राम मंदिर उभं करण्यासाठी निधी गोळ करत आहे. जाहरा बेगम (Zahara Begum) असं या महिलेचं नाव आहे. जाहरा ताहेरा ट्रस्टमध्ये संघटक आहेत. त्या मुस्लीम समुहातील नागरिकांना धार्मिक एकतेसाठी योगदान देण्याचं आवाहन करत आहेत, प्रोत्साहन करत आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचा हा पुढाकार चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे (Muslim woman appeals to her community to raise funds for construction of Ram Temple in Ayodhya).
जाहरा यांनी ‘विविधतेत एकते’ची आठवण करुन तेद सांगतात, “आपण देशात अनेकदा विनायक चतुर्थी, दसरा आणि राम नवमी पूजेचं आयोजन केलंय. यात मुस्लिमांसह सर्व समूह आपल्या हिंदू सहकाऱ्यांना नेहमीच पाठिंबा देत आलेत. मागील 10 वर्षांमध्ये विविध गावांमध्ये काम करताना हिंदूंनी मुस्लीम समुदायाला मशीद, इदगाह आणि कब्रस्तान बांधण्यासाठी जमिनी दान केल्याचंही मी पाहिलंय.”
जाहरा बेगम मुस्लिम समाजातील नागरिकांकडून निधी गोळा करत आहे. त्या मुस्लीम समुदायाने राम मंदिर निर्मितीसाठी दान करावे, असंही आवाहन करत आहेत. त्या म्हणाल्या, “भगवान राम यांचा जन्म आपल्या देशात झाला यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आमच्या काळात राम मंदिर बांधलं जातंय त्यामुळे आम्ही खूप नशिबवान आहोत. भगवान रामांनी धर्माला जीवन जगण्याचा मार्ग म्हणून सांगितलंय. आज संपूर्ण जगासमोर एक आदर्श उभा केलाय. अशा स्थितीत सर्वांनी खुल्या मनाने एकत्र येऊन अयोध्येत एक भव्य राम मंदिर उभारण्यासाठी मदत करायला हवी.”
हेही वाचा :
राम मंदिर निर्माणासाठी राज्यपाल कोश्यारींचा पुढाकार, 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक
राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार : विहिंप
व्हिडीओ पाहा :
Muslim woman appeals to her community to raise funds for construction of Ram Temple in Ayodhya