प्लाझ्मा दान करण्यासाठी ‘त्या’ मुस्लिम तरुणाने रोजा सोडला; दोन महिलांचा जीव वाचला

कोरोनामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, अकीलने वेळीच प्लाझ्मा दिल्यामुळे या दोघींचा जीव थोडक्यात बचावला. | Ramdan roza fast plazma donation

प्लाझ्मा दान करण्यासाठी 'त्या' मुस्लिम तरुणाने रोजा सोडला; दोन महिलांचा जीव वाचला
अकील मन्सुरी
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 3:24 PM

जयपूर: कोरोनासारख्या संकटाच्या काळात धार्मिक गोष्टींपेक्षा माणुसकीचा धर्म जास्त महत्त्वाचा आहे, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. राजस्थानच्या उदयपूर येथे अकील मन्सुरी या तरुणाने रोजाचा उपवास सोडून प्लाझ्मा दान (Plazma Donation) केले. त्यामुळे दोन महिलांचा जीव वाचला. (Muslim Youth Akil Mansuri brek Ramdan roza fast for plazma donation to Covid patients)

अकिल मन्सुरी या तरुणाने आतापर्यंत 17 वेळा प्लाझ्मा दान केले आहे. मात्र, यावेळी त्याच्या प्लाझ्मामुळे दोन महिलांचे जीव वाचले. त्यामुळे उदयपूरमध्ये अकिलचे कौतुक करण्यात येत आहे.अकील मन्सुरी हा 32 वर्षांचा तरुण उदयपूरच्या देबारी परिसरातील रहिवासी आहे. तो बांधकाम क्षेत्रात कामाला आहे. आजपर्यंत अकीलने समाजसेवेची अनेक कामं केली आहेत. मध्यंतरी त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून तो बराही झाला. मात्र, या सगळ्याकडे तो सकारात्मकपणे पाहतो. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना प्लाझ्मा दान करता यावा, यासाठीच आपल्याला कोरोना झाला असावा, अशी त्याची धारणा आहे. त्यामुळे उदयपूरमध्ये ज्याठिकाणी कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज असते त्याठिकाणी अकील मन्सुरी धावून जातो.

सध्या मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजला जाणार रमजानचा महिना सुरु आहे. या काळात अनेकजण उपवास करतात. अकीलही रोजाचा उपवास धरत होता. मात्र, दोन महिलांना प्लाझ्माची गरज आहे असे समजल्यानंतर तो रुग्णालयात गेला. प्लाझ्मा दान करण्यापूर्वी त्याला तुम्ही काही खाल्ले आहे का, असे विचारण्यात आले. मात्र, रोजा असल्यामुळे अकीलने काहीही खाल्ले नव्हते.

मात्र, प्लाझ्मा डोनेशनसाठी काहीतरी खाणे गरजेचे आहे समजल्यानंतर अकीलने कोणताही न विचार करता आपला उपवास सोडला. अकीलने दान केलेल्या प्लाझ्मामुळे निर्मला आणि अलका या दोघींचे प्राण वाचले. कोरोनामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, अकीलने वेळीच प्लाझ्मा दिल्यामुळे या दोघींचा जीव थोडक्यात बचावला.

मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळेना, प्लीज मदत करा, ट्विटरवरुन आवाहन

कोरोनाची स्थिती देशात किती बिकट झाली आहे हे मोदी सरकारच्या मंत्र्याच्या उदाहरणावरुन लक्षात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग यांच्या भावाला बेड मिळत नाहीय. त्यांना बेड मिळण्यासाठी मदत करावी असं आवाहन जनरल व्ही.के.सिंग यांनी ट्विटरवर केलं आहे. गाजियाबादमध्ये त्यांचा भाऊ कोरोनाग्रस्त असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जनरल व्ही.के.सिंग हे मोदी सरकारमधले फक्त मंत्री एवढीच त्यांची ओळख नाही तर ते भारताचे माजी लष्करप्रमुखही आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जर बेड मिळत नसेल तर उत्तर प्रदेशातही कोरोनाची काय स्थिती आहे याचा अंदाज बांधलेलाच बरा.

संबंधित बातम्या:

‘केवळ दिल्लीची हुजरेगिरी करणारे भाजप नेते महाराष्ट्राच्या काय कामाचे?’

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

ऑनलाईन मिळत असलेलं ऑक्सिजनचं किट किती फायदेशीर? देशातल्या सर्वात मोठ्या डॉक्टरचं उत्तर वाचा

बापरे ! मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळेना, प्लीज मदत करा, ट्विटरवरुन आवाहन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.