Muthoot समूहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे निधन, फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत पटकावलेलं स्थान
एमजी जॉर्ज मुथूट हे मुथूट समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे कुटुंबातील तिसर्या पिढीचे सदस्य होते. (MG George Muthoot passes away)
नवी दिल्ली : मुथूट ग्रुपचे (Muthoot) अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट (MG George Muthoot) यांचे शुक्रवारी (5 मार्च) संध्याकाळी निधन झाले. जॉर्ज मुथूट 72 वर्षांचे होते. ‘मुथूट ग्रुप’मधील ‘मुथूट फायनान्स’ ही देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग गोल्ड लोन वित्तीय कंपनी आहे. ( Muthoot Group Chairman MG George Muthoot passes away)
वयाच्या तिशीतच मोठी झेप
एमजी जॉर्ज मुथूट हे मुथूट समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे कुटुंबातील तिसर्या पिढीचे सदस्य होते. 1939 मध्ये केरळात मुथूट कंपनीची स्थापना झाली. एमजी जॉर्ज मुथूट यांनी 1979 मध्ये वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून धुरा हाती घेतली. तर 1993 मध्ये त्यांनी मुथूट समूहाचे अध्यक्षपद स्वीकारलं.
फोर्ब्ज मासिकात सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत
गेल्या वर्षी फोर्ब्ज मासिकातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी स्थान मिळवले होते. या यादीत नाव आलेल्या सहा मल्याळी व्यक्तींपैकी जॉर्ज मुथूट एक होते. एमजी जॉर्ज मुथूट यांच्या नेतृत्वात मुथूट ग्रुपने जगभरात 5000 हून अधिक शाखा आणि 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये विस्तार केला.
भारतातील सर्वात मोठी सुवर्णकर्ज कंपनी
एमजी जॉर्ज यांच्या नेतृत्वात, समूहाची अग्रणी असलेली मुथूत फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी सुवर्णकर्ज कंपनी झाली. कंपनीचे बाजार भांडवल 51 हजार कोटींपेक्षा जास्त असून एकूण उत्पन्न 8 हजार 722 कोटी रुपये आहे.
एमजी जॉर्ज मुथूट हे केरळातील ऑर्थोडॉक्स चर्च (Orthodox Church) चे विश्वस्त होते. याशिवाय ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. एवढेच नव्हे तर जॉर्ज मुथूट हे केरळ राज्य परिषदेचे अध्यक्षही होते. (Muthoot Group Chairman MG George Muthoot passes away)
काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडून श्रद्धांजली
Sad to learn of the passing today of MG George Muthoot, Chairman of The Muthoot Group and Lay Trustee of the Malankara Orthodox Syrian Church. A pillar of the community & a well-wisher whom I will dearly miss. My profound condolences to his family. RIP.https://t.co/DoeCg2J3Ne
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 5, 2021
संबंधित बातम्या
Dharampal Gulati | महाशय धर्मपाल गुलाटींच्या ‘MDH’ कंपनीच्या नावामागील कहाणी माहित आहे?
(Muthoot Group Chairman MG George Muthoot passes away)