माझा संघर्ष कोणा नेत्याविरोधात नाही..भ्रष्टाचाराविरोधात; सचिन पायलट यांची कडाक्याच्या उन्हात संघर्ष यात्रा

पायलट यांच्या यात्रेची तुलना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेशी केली जात असून वाढती गर्दी पाहून अशोक गहलोत यांनीही आता शांतच रहाणे पसंत केले आहे.

माझा संघर्ष कोणा नेत्याविरोधात नाही..भ्रष्टाचाराविरोधात; सचिन पायलट यांची कडाक्याच्या उन्हात संघर्ष यात्रा
Sachin_PilotImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 4:35 PM

मुंबई : राजस्थानाचे मुख्यमंत्री अशोक गहलोत  ( Ashok Gehlot ) यांच्या सरकार विरोधात संघर्ष यात्रा काढून कॉंग्रेसला घरचा आहेर देणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट ( Sachin Pilot ) यांनी आज जनसंघर्ष यात्रेचा ( Jan Sangharsh Yatra ) शेवट करताना सरकारला शेवटचा इशारा दिला. आपण भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी कोणतीही कुर्बानी देण्यास तयार असून जोपर्यंत पेपर लिक घोटाळ्याची निष्पक्षपाती चौकशी होत नाही आणि दोषींना सजा मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचे पायलट यांनी यात्रेच्या समारोप करताना जाहीर केले आहे.

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची जनसंघर्ष यात्रेचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस होता. यावेळी जयपूरात कडक उन्हात त्यांच्या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे पायलट यांच्यावर टीका करणाऱ्या प्रदेश प्रभारी सुखविंदर रंधावा यांचा सूर यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून नरम झाला आहे.

भारत जोडो यात्रेशी तुलना

रंधावा यांनी सचिन यांना आपला लहान भाऊ म्हणत त्यांच्या यात्रेचे टायमिंग जरा चुकलेच अशी सारवासारव केली आहे. आधी रंधावा यांनी पायलट यांच्या लाक्षणिक उपोषणाला पक्षा विरोधी कारवाई म्हटले होते. पायलट यांच्या यात्रेची तुलना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेशी केली जात असून वाढती गर्दी पाहून अशोक गहलोत यांनीही आता शांतच रहाणे पसंत केले आहे.

नुकसान भरपाई मिळायलाच हवी

सचिन पायलट यांनी यात्रेत ज्या मुद्द्यांना उठवले ते जनतेने स्वीकारले आहेत. या यात्रेचा उद्देश्य तरूणांचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचा आहे. पेपर लिक प्रकरणाच्या मूळापर्यंत जाणे गरजेचे असून कोणतीही चौकशी करण्यापूर्वीच अधिकाऱ्या निर्दोषतेचे प्रमाणपत्र देणे चुकीचे असल्याचे सचिन पायलट यांचे म्हणणे आहे. अजमेर हे शिक्षणाचे केंद्र आहे. आम्ही केवळ बदला घेण्यासाठी काम करीत नसून आरपीएससी कार्य पारदर्शक नाही. पेपर लिक प्रकरणात नुकसान झालेल्या उमेदवारांना नुकसान भरपाई मिळायलाच हवी अशी मागणी सचिन पायलट यांनी केली आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा 

माझ्या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा आहे. मी खूप दिवसांपासून राजकारणात आहे. या प्रवासात माझ्यासोबत अनेक साथीदार होते आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहीन. राजकारण हे केवळ पदासाठी नाही, मला जो काही त्याग करावा लागेल त्यासाठी मी तत्पर आहे. पेपरफुटीग्रस्तांना भरपाई मिळायलाच हवी, आरपीएससी विसर्जित करावी, निवड प्रक्रिया नव्याने करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. वसुंधरा सरकारवर झालेल्या आरोपांचीही चौकशी व्हायला हवी असेही पायलट यांचे म्हणणे आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.