नारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा?

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच रात्री त्यांची जामीनावर सुटकाही झाली होती. त्यानंतर आज राणे शाहांच्या भेटीला पोहोचले होते.

नारायण राणेंनी घेतली अमित शाहांची भेट, जनआशीर्वाद यात्रेतील वादावर चर्चा?
अमित शाह, नारायण राणे
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 10:57 PM

नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीमध्ये ही भेट झाली. महाराष्ट्रातील जनआशीर्वाद यात्रे दरम्यान झालेल्या राजकीय नाट्यानंतर नारायण राणे पहिल्यांदाच अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच रात्री त्यांची जामीनावर सुटकाही झाली होती. त्यानंतर आज राणे शाहांच्या भेटीला पोहोचले होते. (Narayan Rane called on Union Home Minister Amit Shah at Delhi)

ऑगस्टमध्ये नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. त्यात केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा समावेश होता. या चौघांपैकी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चांगलीच चर्चेत राहिली. कारण राणे यांनी या यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांबाबत एक वक्तव्य केलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठं वादळ उठलं. राज्य सरकारनं राणेंवर अटकेची कारवाईही केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यामुळे राणे आणि शाह यांच्यात त्या विषयावर चर्चा झाली का? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

‘राणेंची विचारपूस करण्यासाठी अमित शाहांचा फोन’

जनआशीर्वाद यात्रेवेळी राणेंची अटक आणि जामीनानंतर केंद्रातील भाजप नेत्यांनी त्यांची फोनवरुन विचारपूस केली होती. त्यात अमित शाह यांचाही समावेश होता. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली होती. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही अमित शाह यांनी नारायण राणे यांना विचारल्याचे समजते. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली होती.

अमित शाहांशी बोला, रामदास आठवलेंचा सल्ला

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी नारायण राणे यांची त्यांच्या जुहू येथील घरी भेट घेतली होती. तसंच आठवले यांनी नारायण राणेंना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे. राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीची असल्याचा आरोपही आठवले यांनी केला होता.

नारायण राणे हे प्रदीर्घ अनुभव घेतलेले नेते असून त्यांच्यावर झालेली पोलिसी कारवाई अन्यायकारक चुकीची आहे. अशा प्रसंगांना पुरून उरणारे निर्भीड नेते नारायण राणे असून त्यांच्या या प्रसंगात रिपब्लिकन पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याचे सांगत ना रामदास आठवले यांनी नारायण राणे यांना पाठिंबा दिला. नारायण राणे अशा प्रसंगांमुळे डगमणारे नेते नाहीत. ते खंबीर आहेत. निडर अहेत. त्यांनी दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी, असे आठवले यांनी म्हटले होते.

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांचा अजित पवार, काँग्रेसला धक्का? प्रभाग रचनेवर कॅबिनेटमध्ये मतभेद? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी चित्रा वाघ आक्रमक, महाविकास आघाडी सरकारकडे महत्वाची मागणी

Narayan Rane called on Union Home Minister Amit Shah at Delhi

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.