Narendra Modi Parliament Speech | भाषण संसदेत, डोळा बंगालच्या मतांवर? नरेंद्र मोदी यांच्या भाषणात बंगाल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल मोदींनी आभार व्यक्त केले. मात्र मोदींच्या भाषणात वारंवार बंगालचा उल्लेख पाहायला मिळाला. (Narendra Modi Parliament Speech)

Narendra Modi Parliament Speech | भाषण संसदेत, डोळा बंगालच्या मतांवर? नरेंद्र मोदी यांच्या भाषणात बंगाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत भाषण
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 11:10 AM

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Parliament Speech) यांच्या भाषणात बंगालचा उल्लेख पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल मोदींनी आभार व्यक्त केले. मात्र मोदींच्या भाषणात वारंवार बंगालचा उल्लेख पाहायला मिळाला. (Narendra Modi Parliament Speech on West Bengal Corona Vaccine President Speech)

“भारताचा राष्ट्रवाद हा सत्यम, शिवम, सुंदरम”

तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आठवण काढली.आपली लोकशाही ही वेस्टर्न अर्थात पाश्चत्य नाही तर मानवतावादी आहे, भारताचा राष्ट्रवाद हा ना स्वार्थी, ना आक्रमक. भारताचा राष्ट्रवाद हा सत्यम, शिवम, सुंदरम असल्याचं नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं. आज त्यांची 125 वी जयंती आपण साजरी करत आहोत, पण आपण नेताजींच्या आदर्शांना विसरलोत, असा टोला मोदींनी लगावला.

गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत उत्तर द्यायचं होतं. पण, सतत तीन दिवसांच्या गोंधळानंतर सभागृहाचं कामकाज झालं नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत संवाद साधला.

संघराज्य पद्धती या कोरोना काळात मजबूत झाली – मोदी

केंद्र आणि राज्याने मिळून चांगलं केलं, राज्यांना मी विशेष धन्यवाद देतो, संघराज्य पद्धती या कोरोना काळात मजबूत झाली, लोकशाहीवरून खूप उपदेश दिले गेले, भारताची लोकशाही अशी नाही की जिचे सालपटं काढली जातील, डेरेक ओ ब्रायन मोठमोठे शब्द वापरत होते, कळतच नव्हतं देशाबद्दल बोलतायत की बंगालबद्दल, असा निशाणाही मोदींनी साधला.

मैथिली शरण गुप्त यांची कविता मोदींकडून संसदेत सादर

अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चुपचाप पडा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल, अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत आत्मनिर्भरता के पथपर दौड

(Narendra Modi Parliament Speech on West Bengal Corona Vaccine President Speech)

भारताची लोकशाही ही लोकशाहींची आई, आपण मुळातच लोकशाहीवादी आहोत, आणीबाणीच्या काळात मीडिया, न्यायपालिकेची काय स्थिती होती ते आठवा, संधी मिळताच लोकांनी लोकशाही पुन्हा स्थापित केली, असंही मोदींनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

PM Narendra Modi Live : सभागृहात सविस्तर चर्चा का नाही? शेतकरी आंदोलनावरुन मोदींचा सवाल

(Narendra Modi Parliament Speech on West Bengal Corona Vaccine President Speech)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.