AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात पुन्हा एकदा भाजप सरकार?, जाणून घ्या मोदी सरकारची आतापर्यंतची कामगिरी?

कोरोना महामारी आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये देश पातळीवर निवडणुका घेतल्यास नरेंद्र मोदी यांचाच पुन्हा विजय होईल असे एका सर्वेतून समोर आले आहे. (Narendra modi popularity survey)

देशात पुन्हा एकदा भाजप सरकार?, जाणून घ्या मोदी सरकारची आतापर्यंतची कामगिरी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jan 22, 2021 | 7:11 AM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जनतेने पुन्हा एकदा भरभरुन प्रेम केले आहे. कोरोना महामारी आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये देश पातळीवर निवडणुका घेतल्यास नरेंद्र मोदी यांचाच पुन्हा विजय होईल असे एका सर्वेतून समोर आले आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि कार्वी इनसाईट्स या संस्थांनी याबाबत सर्वे केला आहे. या सर्वेचं नाव मूड ऑफ दि नेशन असून त्यातून मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे समोर आले आहे. (Narendra modi popularity survey amid of corona pandemic and farmers protest)

सर्वेचं स्वरुप काय?

हा सर्वे एकूण 19 राज्यांमध्ये केला गेला. यावेळी 97 लोकसभा मतदारसंघ आणि 194 विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. 3 ते 13 जानेवारीदरम्यान 12,232 लोकांचा सर्वे केला गेला. यावेळी जनतेला कोरोना महामारी, बेरोजगारी, चलनवाढ, वित्तीय तूट अशा विविध बाबींवर प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर दिलेल्या उत्तरांनुसार मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे समोर आले आहे.

या सर्वेतून एनडीए सरकारसंबंधी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सर्वे केलेल्या लोकांमधून एकूण 60 टक्के जनता मोदींच्या कारभारावर समाधानी आहे. तर मोदींच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री अमित शाह यांची कामगिरी सर्वोत्तम असून त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा नंबर येतो. शाह आणि राजनाथ सिंह यांच्यानंतर परिवहनमंत्री नितीन गडकरी हे सर्वात कार्यक्षम मंत्री असल्याचे जनतेला वाटते.

सरकारच्या निर्णयावर लोकांचे मत काय?

मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून आतापर्यंत अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये आपल्या पहिल्या कार्यकाळात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी, नोटबंदी असे अनेक निर्णय मोदी सरकारने घेतले. त्यानंतर राम मंदीर उभारणी, अनुच्छेद 370 रद्द करणे, कोरोना महामारीला थोपवण्यासाठीच्या उपायोजना, मेक इन इंडिया अशे विविध निर्णय मोदी सरकारने घेतले. मोदी सरकारच्या या निर्णयाविषयी जनतेच्या प्रतिक्रिया विचारण्यात आल्या. राम मंदिराची उभारणी ही मोदी सरकारची सर्वोत्तम कामगिरी (27 टक्के) असल्याचे जनतेला वाटते. अनुच्छेद 370 रद्दबातल ठरवण्याचा निर्णयही जनतेला महत्त्वाचा (20 टक्के) वाटतो.

आज निवडणुका झाल्या तर काय?

आज निवडणुका झाल्या तर पुन्हा मोदी सरकारला किती जागा मिळणार यावरेखील या सर्वेमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. सर्वेनुसार मोदी सरकारला बेरोजगारीचा प्रश्न सोडवता आलेला नाही. सर्वे केलेल्यांपैकी 29 टक्के जनतेला मोदी सरकारचे हे अपयश असल्याचे वाटते. मोदी सरकार चलनवाढीवर नियंत्रण मिळवू न शकल्याचे 13 टक्के जनतेला वाटते. आज निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत येतील असं या सर्वेत सांगण्यात आले आहे. आज निवडणूक घेतली तर सर्वेमध्ये सांगितल्यानुसार भाजपला 291 जागा मिळतील.

दरम्यान, मोदींच्या अप्रुव्हल रेटींगमध्ये काही प्रमाणात घसरण (4 टक्के) झाली असली तरी निवडणुका झाल्यास मोदी सरकारच पुन्हा एकदा स्थापन होईल असे या इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्स यांच्या सर्वेत सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Budget 2021: करदात्यांना झटका बसण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कररचनेत बदल होणार?

BREAKING: पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रीही लस घेणार; केंद्राचा मोठा निर्णय

(Narendra modi popularity survey amid of corona pandemic and farmers protest)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.