सर्वांपासून समान अंतर ते सर्वांना सोबत घेऊन चला… भारताची पॉलिसी कशी बदलली?; नरेंद्र मोदी यांनी सांगितला बदल
भारत जगातील एकमेव महत्वाची अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या १० वर्षांत आपल्या विकास दर (जीडीपी) दुप्पट झाला आहे. मागच्या दशकात भारताने २ लाख कोटी डॉलर आपल्या अर्थव्यस्थेत जोडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी .टीवी 9 नेटवर्कचा मेगा इव्हेट 'व्हाट इंडिया थिंक्स टुडे' मध्ये सांगितले.

टीवी 9 नेटवर्कचा मेगा इव्हेट ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today) ला शुक्रवारी नवी दिल्लीत सुरुवात झाली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच गेल्या काही वर्षांत भारताने केलेल्या गौरवशाली कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज जगाची नजर भारतावर आहे. आपल्या देशावर आहे. जगात तुम्ही कोणत्याही देशात जा, तिथले लोक भारताबाबत उत्सुक असतात. त्यांना भारताबद्दल कुतूहल असते.
दहा वर्षांत विकास दर दुप्पट
भारताने गेल्या अकरा वर्षांत केलेल्या प्रगतीबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, जो देश ७० वर्षांत ११ व्या नंबरची अर्थव्यवस्था होता. तो गेल्या सात आठ वर्षांत पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) चे नवीन आकडे समोर आले आहेत. त्यानुसार भारत जगातील एकमेव महत्वाची अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या १० वर्षांत आपल्या विकास दर (जीडीपी) दुप्पट झाला आहे. मागच्या दशकात भारताने २ लाख कोटी डॉलर आपल्या अर्थव्यस्थेत जोडले आहे, असे मोदी म्हणाले.
विकास दर वाढल्याने काय फायदे झाले?
विकास दर वाढल्याचे काय फायदे होतात, त्याबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, जीडीपी डबल होणे म्हणजे केवळ आकडे बदलणे नाही. त्याचे परिणाम दिसत आहेत. २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. हे २५ कोटी लोक एक न्यूओ मिडल क्लासचा भाग झाले आहे. हा न्यूओ मिडल क्लास नवीन आयुष्य सुरू करत आहे. नव्या स्वप्नांना घेऊन जात आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत ते महत्वाचे योगदान देत आहे.
आता भारताचे धोरण बदलले
जगातील सर्वात जास्त तरुण आपल्या देशात आहे. हे तरुण स्किल्ड होत आहे. इनोव्हेशनला गती देत आहे. त्यामध्ये भारताच्या फॉरेन पॉलिसीचा मंत्र इंडिया फर्स्ट झाला. एकेकाळी भारताचे धोरण सर्वांपासून समान अंतरावर राहण्याची होती. आजच्या भारताचे धोरण आहे सर्वांसोबत राहण्याचे आहे. सर्वांना सोबत घेऊन चला. जगातील देश भारताची ओपिनियन, भारताचे इनोव्हेशन आणि भारताच्या एफर्टला महत्त्व आज देत आहेत. तसे पूर्वी कधीच झाले नाही. आज जगाची नजर भारतावर आहे, असे नरेंद्र मोदी यांनी ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ कार्यक्रमात सांगितले.