मोदींचाही बंगाल दौरा रद्द, उच्च स्तरीय बैठक बोलावली, राहुलजींच्या पावलावर पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद, काँग्रेसची प्रतिक्रिया

नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत उच्चस्तरीय बैठका उद्या बोलावल्या आहेत.  Narendra Modi high level meeting

मोदींचाही बंगाल दौरा रद्द, उच्च स्तरीय बैठक बोलावली, राहुलजींच्या पावलावर पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद, काँग्रेसची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 6:54 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्याचा पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत उच्चस्तरीय बैठका उद्या बोलावल्या आहेत.  पश्चिम बंगालला ऊद्या जाणार नसल्याचं नरेंद्र मोदींनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे. तर काँग्रेसकडून नरेंद्र मोदींना राहुल गांधीच्या पश्चिम बंगालमध्ये सभा न घेण्याचं जाहीर केलं होतं. त्या पावलावर पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे. (Narendra Modi will chairing high level meeting on review of corona situation and cancel visit of West Bengal Congress welcome  PM )

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या उच्चस्तरीय बैठका

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार कोरोनासंदर्भात देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सकाळी 9 वाजता उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता सर्व राज्यांवर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आलेल्या तणावासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मिटींग आयोजित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी दुपारी 12.30 वाजता देशातील आघाडीच्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजनच्या स्थितीबद्दल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. वैद्यकीय क्षेत्रासाठी ऑक्सिजन कशा प्रकारे वाढवण्यात येईल यासोबत ऑक्सिजन कसा वाढवावा, याविषयी त्यांनी चर्चा केली. तर, जे साठेबाजी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना नरेंद्र मोदी यांनी दिल्या.

काँग्रेसकडून नरेंद्र मोदींना धन्यवाद

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याबद्दल आभार मानले. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील सभा रद्द केल्या होत्या. राहुल गांधीच्या पावलावर पाऊल टाकत नरेंद्र मोदी यांनी त्यांचा प्राधान्यक्रम बदलला याविषयी धन्यवाद, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

दरम्यान, आज झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करण्याचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्याची माहिती पंतप्रधान कार्यालायनं दिली आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर; महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण

नाना पटोले भेटल्यावर विचारणार, अक्षय, अमिताभच्या शूटिंगला विरोध का? : अजित पवार

(Narendra Modi will chairing high level meeting on review of corona situation and cancel visit of West Bengal Congress welcome  PM )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.