AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘परीक्षा पे चर्चा’ मधून पंतप्रधान पुन्हा साधणार विद्यार्थ्यांशी संवाद, प्रकाश जावडेकरांची Koo वरून माहिती

कोरोनाच्या संकटामुळे यावेळी पंतप्रधान मोदी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.

'परीक्षा पे चर्चा' मधून पंतप्रधान पुन्हा साधणार विद्यार्थ्यांशी संवाद, प्रकाश जावडेकरांची Koo वरून माहिती
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 9:41 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुन्हा ‘परीक्षा पे चर्चा’ या खास कार्यक्रमातून तरुणांशी संवाद साधणार आहेत. यासंबंधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘koo’ वरून यासंबंधी माहिती दिली आहे. खरंतर, प्रकाश जावडेकर यांनी गेल्या काही दिवसांआधीच या नव्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आपलं खातं उघडलं होतं. आता यावरून त्यांनी सरकारच्या कामाचे अपडेट्स देत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आता परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद साधणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Prime Minister will again interact with the students through Pariksha Pay Charcha prakash Javadekars information from Koo)

जावडेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं की, ‘अखेर प्रतिक्षा संपली! परीक्षा पे चर्चा 2021, प्रेयरणादायी कार्यक्रमातून नरेंद्र मोदी पुन्हा आले आहेत. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा क्षण असणार आहे. त्यांच्याशी संवाद साधा, परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्यासाठी त्यांच्याकडून मंत्र जाणून घ्या. ते फक्त परीक्षेत मदतच नाही तर आयुष्यावरही मार्गदर्शन करतील.’

नेमकं काय म्हणाले प्रकाश जावडेकर?

‘The wait is finally over! Pariksha Pe Charcha 2021, with the inspiring PM Shri Narendra Modi ji is back, this time bigger than ever! Interact with him, learn the mantras that will not only help you deal with exam-stress but also guide you in life’

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे यावेळी पंतप्रधान मोदी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसमवेत ही चर्चा आयोजित केली जाणार आहे.

त्यांनी लिहिले की, ‘कोव्हिड- 19 संसर्गामुळे यंदा चर्चा ऑनलाईन होणार आहे. या चर्चेसाठी नोंदणी गुरुवारपासून सुरू होणार असून 14 मार्च रोजी संपेल. चर्चेदरम्यान, प्रश्न विचारण्यासाठी स्पर्धेतून विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.’ खरंतर, पहिल्यांदा परीक्षा पे चर्चा 16 फेब्रुवारी, 2018 रोजी आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधानांसह शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मोदींशी मनसोक्त चर्चा केली होती. (Prime Minister will again interact with the students through Pariksha Pay Charcha prakash Javadekars information from Koo)

संबंधित बातम्या – 

प्राण गमावलेल्या 2 कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना केजरीवाल सरकारकडून प्रत्येकी 1 कोटीची मदत

मोठी बातमी! 24 लाख एकर शेतीत काय पिकतंय? सरकारचे माहिती देण्याचे आदेश

VIDEO | तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, राहुल गांधींचा हा व्हिडीओ तुम्ही लाईक केल्याशिवाय राहणार नाही ! मुलगी तर सातवे आसमान पर !

(Prime Minister will again interact with the students through Pariksha Pay Charcha prakash Javadekars information from Koo)

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.