नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर घणाघाती टीका केली.(Narendra Tomar Congress )

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय
नरेंद्र सिंह तोमर (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 3:26 PM

नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांवरुन काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तोमर यांनी यावेळी भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचं सांगितलं. भारतात शेतकरी पाण्याचा वापर करुन शेती करतात. मात्र, काँग्रेसचं असा पक्ष आहे ज्याला फक्त रक्ताद्वारे शेती करायची आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र सिंह तोमर यांनी केली. (Narendra Singh Tomar slam Congress over Farmer Protest and Farm laws)

नरेंद्रसिंह तोमर काय म्हणाले?

शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला. विरोधी पक्ष कृषी कायद्यांना काळे कायदे म्हणत आहेत. त्यांनी कायद्यांमध्ये काय काळं आहे, हे सांगणार की नाही, असा सवाल केला. नवीन कृषी कायद्यांद्वारे शेतकरी त्यांचा शेतमाल देशातील कोणत्याही शहरात विकू शकतात. जर बाजारसमितीच्या बाहेर व्यापार झाला तर त्यावर कोणताही कर लावला जाणार नाही, असं तोमर म्हणाले.

राज्य सरकारचा कर रद्द

नरेंद्रसिंह तोमर यांनी नवीन कृषी कायद्यामुळे राज्य सरकारनं लावेलेल कर रद्द होतात. मात्र, राज्य सरकारचा कायदा कर द्यावा लागेल असं सांगतो. नरेंद्र सिंह तोमर यावेळी बोलताना पुढे म्हणाले की ज्यांच्या कायद्यात कर घेण्याची तरतूद आहे त्यांच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे. मात्र,इकडे उलटी गंगा वाहत आहे. पंजाब सरकारच्या कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्यांन चूक केली तर त्याला शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र, केंद्राच्या कायद्यामध्ये ही तरतूद नाही.

काँग्रेसला रक्तानं शेती करायचीय

नरेंद्रसिंह तोमर यावेळी बोलताना म्हणाले की आम्ही शेतकऱ्याशी 12 वेळा चर्चा केली. त्यांच्या विरोधात काहीही बोललो नाही. तुम्हाला बदल पाहिजे असेल तर बदल सांगण्याची विंनती केली. मात्र, केंद्र सरकार कृषी कायद्यात बदल करत असेल तर कायदे चुकीचे आहेत, असं होत नाही. फक्त एका राज्याच्या शेतकऱ्यांना कृषी कायद्यांविरोधात भडकवलं जात आहे. शेतकऱ्यांना घाबरवलं जात आहे. शेती करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. मात्र, काँग्रेसला रक्ताची शेती करायची आहे, असा आरोप तोमर यांनी केला. शेती क्षेत्रात केंद्र सरकारनं काम केल आहे. आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवल्याचं तोमर म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘आंदोलक शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधाही केंद्रानं रोखल्या,’ विरोधी पक्षाच्या खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

शेतकरी आंदोलनाला रिहाना ते ग्रेटाच्या पाठिंब्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?

(Narendra Singh Tomar slam Congress over Farmer Protest and Farm laws)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.