‘हिंदुस्थानात’ राहायचे असेल तर ‘लक्ष्मी-गणेशा’चा जय घालावाच लागेल,’आप’ आमदाराचा भाजपवर हल्लाबोल

भाजपच्या लोकांना गणेशजी, लक्ष्मी यांची अडचण वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे.

'हिंदुस्थानात' राहायचे असेल तर 'लक्ष्मी-गणेशा'चा जय घालावाच लागेल,'आप' आमदाराचा भाजपवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 8:46 PM

नवी दिल्लीः नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणेशजी (Ganesh) आणि लक्ष्मीजींचाही (Laxmi) फोटो असायला हवा असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला, आणि त्यावरुन जोरदार राजकारण सुरू आहे. आता या राजकारणात आपचे आमदार नरेशकुमार बालियान (Naresh Balyan) यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपला गणेशजी आणि लक्ष्मीजींची अडचण वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे, असा सल्ला त्यांना दिला आहे. त्यावरुन प्रचंड मोठे राजकारण सुरु झाले आहे.

याबद्दल नरेशकुमार बालियान यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भाजपच्या लोकांना गणेशजी, लक्ष्मी यांची अडचण वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे.

भाजपच्या नेत्यांना भगवान श्री गणेश-लक्ष्मीजींबद्दल काही अडचण नसेल आणि ते खरे हिंदू असतील, तर उघडपणे जय श्री गणेश-जय लक्ष्मी माता” लिहावे असं जाहीर आव्हानही त्यांनी केले आहे.

आणि ते जर तसं लिहित नसतील तर ते हिंदूविरोधी आहेत हे समजून घ्या अशी जोरदार टीका त्यांच्या वर केली आहे. त्यामुळे भारतातच राहायचे असेल तर गणेश-लक्ष्मी जय हे म्हणावेच लागेल असंही त्यांनी म्हटले आहे.

नरेशकुमार बालियान यांनी भाजपर सडेतोड हल्ला करत त्यांनी भाजप पक्ष हा हिंदूंचा केवळ मतांसाठी वापर करत असल्याचा दावा करत आहे.

भाजपला हिंदूबद्दल अजिबात आदर नसल्याचेही त्यांनी सांगितले. सणासुदीच्या पहिल्याच दिवशी गुजरातमधील भाजपचे कार्यकर्ते मात्र लक्ष्मी आणि गणेशाला विरोध करत आहेत.

त्यामुळे भाजपवाल्यांनी हिंदूंचा फक्त मतं मागण्यासाठी वापर करुन घेतला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत गणेशच तुम्हाल संपवून टाकेल असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.