नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कमांडर नितीन भालेराव यांना वीरमरण, छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी घडवलेल्या IED स्फोटात 10 जवान जखमी

छत्तीसगडमधील ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी रात्री 2 IED स्फोट घडवून आणले. या स्फोटात कोबरा 206 बटालियनचे सहाय्यक कामांडर नितीन भालेराव यांना वीरमरण आलं.

नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कमांडर नितीन भालेराव यांना वीरमरण, छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी घडवलेल्या IED स्फोटात 10 जवान जखमी
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 10:33 AM

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या IED स्फोटात नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कामांडर नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एकूण 10 जवान जखमी झाले आहेत. त्यात 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. सर्व जखमींना रात्री एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. शहीद नितीन भालेराव हे नाशिकचे सुपुत्र आहेत. नाशिकच्या राजीव नगर भागात त्यांचे कुटुंबीय वास्तव्याला आहे. (Nashik CRPF jawan Nitin Bhalerao martyred in Naxal blast)

ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांनी रात्री 2 IED स्फोट घडवून आणले. या स्फोटात कोबरा 206 बटालियनचे सहाय्यक कामांडर नितीन भालेराव यांच्यासह 1 अधिकारी आणि 8 जवान जखमी झाले. नितीन भालेराव यांनी अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर अन्य 9 जवानांवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून शहीद भालेराव यांना श्रद्धांजली

नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कामांडर नितीन भालेराव हे छट्टीसगडमध्ये शहीद झाले आहेत. त्यांच्या कंपनी कमांडरशी आपलं बोलणं झाल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. शहीद नितीन भालेराव यांचं पार्थीव रायपूरवरुन विमानाने मुंबईत आणलं जाईल. तिथून ते नाशिकला येईल. त्यानंतर नातेवाईक यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. देशासाठी बलिदान देणाऱ्या नाशिकच्या वीर योद्ध्याला मन:पूर्वक श्रद्धांजली, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी शहीद नितीन भालेराव यांना आदरांजली वाहिली.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये नक्षलवादी हल्ला, गया जिल्ह्यात नियोजित पोलीस ठाण्याची इमारत स्फोटकांनी उद्ध्वस्त

कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सीआरपीएफवर नक्षलवादी हल्ला, 17 जवानांना वीरमरण

Nashik CRPF jawan Nitin Bhalerao martyred in Naxal blast

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.