80 वर्षीय NSA अजित डोभाल यांची किती आहे पगार? काय, काय मिळतात सुविधा?
Ajit Doval Salary: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारास व्हीव्हीआयपी सुविधा दिल्या जातात. त्यामध्ये हाय-सिक्योरिटी बंगला, हाय सिक्योरिटी, सरकारी वाहन, विदेश प्रवास अन् इतर भत्यांचा समावेश आहे. एनएसए देशाची राष्ट्रीय सुरक्षासंदर्भातील सर्व मुद्यांवर पंतप्रधानांना सल्ला देत असतात. या पदाची जबाबदारी केवळ आंतरिक सुरक्षा नाही तर परराष्ट्र नीती, संरक्षण धोरण यावरही आहे.

National Security Advisor of India Ajit Doval: देशाच्या सुरक्षेचा जेव्हा विषय येतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममधील एका व्यक्तीचे नाव समोर येते. ते म्हणजे देशाच्या सुरक्षा नीतीचे रणनीतीकार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल हे आहे. डोभाल हे नरेंद्र मोदी यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहे. त्यामुळे सुरक्षेसंदर्भातील काही प्रश्न आला की अजित डोभाल यांची चर्चा होत असते. अजित डोभाल यांची भूमिकाच नाही तर त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि पगाराची माहिती जाणून घेण्याची उत्सुक्ता जनतेला असते.
किती आहे वेतन
रिपोर्टनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या पदासाठी महिन्याला मूळ वेतन 1 लाख 37 हजार 500 रुपये आहे. मूळ वेतनाशिवाय इतर अनेक सुविधा त्यांना देण्यात येतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाचा पगार त्या व्यक्तीचा कार्यकाळ, अनुभव, सरकारकडून देण्यात येत असलेल्या जबाबदाऱ्या त्यानुसार दिले जात असते. अजित डोभाल मागील अनेक वर्षांपासून या पदावर आहेत. ते सरकारची धोरणे आणि आंतरराष्ट्रीय कुटनीतीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारास व्हीव्हीआयपी सुविधा दिल्या जातात. त्यामध्ये हाय-सिक्योरिटी बंगला, हाय सिक्योरिटी, सरकारी वाहन, विदेश प्रवास अन् इतर भत्यांचा समावेश आहे. एनएसए देशाची राष्ट्रीय सुरक्षासंदर्भातील सर्व मुद्यांवर पंतप्रधानांना सल्ला देत असतात. या पदाची जबाबदारी केवळ आंतरिक सुरक्षा नाही तर परराष्ट्र नीती, संरक्षण धोरण यावरही आहे. अजित डोभाल 2014 पासून या पदावर आहेत.




या असतात सुविधा
विदेशातील भारतीय रणनीतीवर देखरेख ठेवणे आणि चर्चेसाठी एनएसए यांना विदेश दौऱ्यावर पाठवले जाते. त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलते. त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट, फर्स्ट-क्लास प्रवास, उच्चस्तरीय प्रोटोकॉल यासारख्या सुविधाही दिल्या जातात. त्यांना विशेष भत्ते आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतो. त्यात वैद्यकीय सुविधा, सरकारी क्लबचे सदस्यत्व, गोपणीय कार्यासाठी विशेष फंड यासारखी व्यवस्थेचा समावेश आहे. एनएसए यांचे संपूर्ण लक्ष देशाच्या सुरक्षेवर राहावे, अशी पॅक सिस्टम त्यांना मिळते.