India-Pakistan : युद्धाची शक्यता असताना माजी रॉ चीफवर मोठी जबाबदारी, सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय
India-Pakistan : केंद्र सरकारने आज सकाळी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. सध्या भारत-पाकिस्तान तणाव टिपेला पोहोचलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एकापाठोपाठ एक पाच बैठका केल्या. हे सगळं मोठ काहीतरी घडणार याचे संकेत देत आहे.

सध्या भारत-पाकिस्तान तणाव टिपेला पोहोचला आहे. कुठल्याही क्षणी काहीही मोठं घडेल अशी स्थिती आहे. अशावेळी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाची पूनर्स्थापना केली आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. पूर्व पश्चिम एअर फोर्स कमांडर एअर मार्शल पीएम सिन्हा, पूर्व दक्षिणी सेना कमांडर लेफ्टनेंट जनरल एके सिंह आणि रियर एडमिरल मोंटी खन्ना सैन्य सेवांमधून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा या बोर्डात समावेश करण्यात आला आहे. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंह भारतीय पोलीस सेवेतून दोन सेवानिवृत्त सदस्य आहेत. बी वेंकटेश वर्मा सात सदस्यीय बोर्डामधील सेवानिवृत्त आयएफएस आहेत.
एनएसएबी एक मल्टी डिसिप्लिनरी बॉडी आहे. सरकार बाहेरचे लोक या समितीवर असतात. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित स्थितीच विश्लेषण करणं तसच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांच समाधान आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्लानच शिफारसी करणं हे या समितीच काम आहे.
2018 नंतर प्रथमच बदल
2018 नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डात बदल करण्यात आला आहे. बोर्डात सैन्य, आयपीएस आणि आयएफएस पार्श्वभूमीच्या 7 सदस्यांच समावेश करण्यात आला आहे. एनएसएबी सुरक्षा विश्लेषण आणि शिफारसी करतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेत महत्त्वाचे बदल केले आहेत. भविष्याच्या दृष्टीने हे बदल महत्त्वाचे ठरतील.
पंतप्रधान मोदींच्या सकाळपासून पाच बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एकापाठोपाठ एक पाच बैठका केल्या. यात सीसीएस, सीसीपीए, सीसीईएसह केंद्रीय सचिवांची सुद्धा बैठक होती. पंतप्रधान मोदींच्या या बैठका तीन तास चालल्या. सकाळी 11 वाजल्यापासून पंतप्रधान निवासस्थानी या बैठकांच सत्र सुरु झालं. पहलगाम हल्ल्यानंतर 23 एप्रिलला सीसीएसची पहिली बैठक झाली होती.
