AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय भूकंपाने दिल्ली हादरणार? अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता, अख्ख पोलीस दल अलर्ट

Delhi CM Arvind Kejriwal may be arrested दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार? केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय. काय आहे कारण? हा मद्यघोटाळा काय आहे? आतापर्यंत या मद्यघोटाळ्यातील कारवाई काय? आज काय घडणार? वाचा सविस्तर...

राजकीय भूकंपाने दिल्ली हादरणार? अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता, अख्ख पोलीस दल अलर्ट
| Updated on: Jan 04, 2024 | 10:36 AM
Share

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 04 जानेवारी 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे. कार्यालयीन स्टाफलाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. कालच आपने केजरीवाल यांना अटक करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी 3 वेळा समन्स देवूनही केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

आज काय घडणार?

आज सकाळपासूनच केजरीवाल यांना अटक होणार असल्याची चर्चा होतेय. तशा बातम्या येत आहेत. मात्र या प्रकरणी आता अपडेट आली आहे.  ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. केजरीवाल यांच्या घरावर आज छापेमारी होणार नाही. तर पुन्हा एकदा म्हणजेच चौथ्यांदा अरविंद केजरीवाल यांना समन्स देण्यात येणार आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी ईडी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची शक्यता आहे.

मद्यघोटाळा काय आहे?

2021-2022 या वर्षात दिल्लीत नवं मद्यधोरण लागू झालं. नव्या मद्यधोरणामुळे मद्य व्यावसायाला खासगी लोकांकडे देण्यात आलं. हे नवं धोरण डीलर्सना फायदा करून देण्यासाठी आणण्यात आलं असल्याचा आरोप दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारवर लावण्यात आला. उपराज्यपालांनी मुख्य सचिवांना याबाबतचा अहवाल मागितला. या रिपोर्टमध्ये गडबड असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला.

144 कोटींचा या नव्या धोरणात घोटाळा झाल्याचं बोललं गेलं. या रिपोर्टच्या आधारावर सीबीआय चौकशीला मंजुरी देण्यात आली. तत्कालिन उत्पादन शुल्क मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 अटक करण्यात आली.

मद्यघोटाळ्यातील कारवाई

ऑगस्ट 2022 ला सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सप्टेंबर 2022 मध्ये या प्रकरणातील आरोपी विजय नायरला अटक झाली . 25 नोव्हेंबर 2022 सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं. 26 फेब्रुवारी 2023 ला मनीष सिसोदिया यांनी अटक झाली. एप्रिल 2023 पासून सीबीआयने केजरीवाल यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर आता आज केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स दिलं जाणार आहे.

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.