MP Supriya Sule : ‘या’ खासदारावर हक्कभंगाची कारवाई करा; सुप्रिया सुळे यांची लोकसभा सचिवालयाला नोटीस
MP Supriya Sule on MP Ramesh Bidhuri Statement : 'ते' वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसतं, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाकडे केली आहे. तशी नोटीसही सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला दिली आहे. वाचा सविस्तर...
नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला नोटीस दिली आहे. त्या खासदाराने केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह आहे. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधातलोकसभा सचिवालयाकडे हक्कभंगाची नोटीस सुप्रिया सुळे यांनी पाठवली आहे. रमेश बिधुडी यांनी केलेलं वक्तव्य हक्कभंगाच्या कारवाईत बसतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी नोटीसद्वारे मागणी केली आहे. रमेश बिधुडी यांचं वक्तव्य लोकसभेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारं आहे. नियमानुसार हे वक्तव्य हक्कभंगमध्ये बसतं. त्यामुळे यात हस्तक्षेप करत प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी सभागृहात बोलताना बसपाचे खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. बिधुरी यांच्या वक्तव्याचा विरोधकांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. बिधुरी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. बसपाचे खासदार दानिश अली यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे विरोधक आक्रमक झालेत. त्यांच्यावर हक्कभंग आणावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दानिश अली बसपाचे आहेत. पण या मुद्द्यावर बसपापेक्षा इतर पक्ष जास्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला नोटीस पाठवली आहे. सुळे यांच्यासह तृणमूलच्या अपूर्वा पोद्दार, डीएमकेच्या खासदार एम. के. कनिमोळी यांनीही हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या प्रकारावर आपलं मत मांडलं. याप्रकरणी आम्ही आणि तृणमल काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे. आपण भारतीय आहोत, याचा अभिमान सगळ्यांनी बाळगला पाहिजे. पण भाजपचे लोक सातत्याने असं वागतात. महिला विधेयक पास होतानाच महिलांना शिवीगाळ केली गेली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी संसदेत दमदार भाषण केलं. यात त्यांनी मोदी सरकारला सवाल केले. याबाबतही सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती दिली. आदरणीय अजितदादा माझे मोठे बंधू आणि माझ्यावर जे संस्कार झाले त्यानुसार मोठ्या बंधूंचा मान सन्मान केला गेला पाहिजेच. मी अजित दादांच्या विरोधात कधीच भूमिका मांडली नाही आणि मांडणार देखील नाही. मी केलेलं विधान कुठल्याही व्यक्तीसाठी नसून आदरणीय प्रधानमंत्री आणि अमित शाहांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्ष सातत्याने राष्ट्रवादीवर टीका केली आणि आता आमच्यातल्याच काही लोकांना बाजूला घेऊन कसे काय बसलात. मग तुम्ही आधी आमच्या पक्षावर केलेले आरोप राजकीय होते की खोटे होते?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.