Independence Day 2023 : मेरे प्यारे 140 करोड परिवारजन…; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे

PM Narendra Modi Speech on Independence Day 2023 : जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र, पुढील 1000 वर्षे, मणिपूरमधील हिंसाचार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील पाच मोठे मुद्दे, कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं? देशातील युवकांना काय संदेश दिला? वाचा सविस्तर...

Independence Day 2023 : मेरे प्यारे 140 करोड परिवारजन...; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 8:39 AM

नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 2023 : देशभर आज उत्साहाचं वातावरण आहे. देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. अशात उत्साह आणि चैतन्याने भरलेलं आजचं वातावरण आहे. अशात देशाचं लक्ष राजधानी दिल्लीकडे लागलं आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला गेला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांच्या वतीने तिरंग्याला सलामी दिली. यावेळी लालकिल्ला परिसरात देशभक्तीने ओतप्रोत वातावरण पाहायला मिळालं. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. देशातील युवकांना त्यांनी संदेश दिला.

लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सलग दहाव्यांदा ध्वजारोहण झालं. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी 74 मिनिटांचे भाषण केलं होतं. त्यामुळे यंदाच्या भाषणातील मुद्द्यांकडे देशातील नागरिकांचं लक्ष आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील पाच मोठे मुद्दे वाचा…

1. मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा

नेहमी मेरे प्यारे देशवासीयों…, असं म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात करण्याऱ्या पंतप्रधान मोदी यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाची सुरुवात मेरे प्यारे परिवारजण असं म्हणत केली. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलं. मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला. पंतप्रधान मोदी यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी, अशी वारंवार मागणी केली. त्यानंतर आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर भाष्य केलं.

मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपल जीवन गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

2. पुढील एक हजार वर्षांवर भाष्य

मी 1000 वर्षांपूर्वी गोष्ट यासाठी बोलतोय कारण पुन्हा एकदा संधी आली आहे. हे अमृतकाळाच पहिल वर्ष आहे. या कालखंडात आपण जी पावलं उचलू, जे निर्णय घेऊ त्याचा पुढच्या 1000 वर्षावर प्रभाव पडेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

3. युवांचा देश भारत!

आज जगात 30 वर्षापेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे.याच्या बळावर आपण बरच काही साध्य करु शकतो. आता आपल्याला थांबायच नाहीय, दुविधेमध्ये जगायच नाहीय, गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे. आपण जे काही निर्णय घेऊ, ते पुढच्या 1000 वर्षाची दीशा निर्धारित करतील. आपल्याकडे लोकशाही आणि विविधता आहे. जगातील देश वयोवृद्ध होत चालले आहेत. पण भारत युवा होतोय. आज घेतलेल्या निर्णयाने भविष्य निश्चित होईल. सामर्थ्य देशाचं भाग्य बदलेल. आता थांबायचं नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

4. निर्यात वाढतेय

भारतातून निर्यात वेगाने वाढतेय. तज्ज्ञ याकडे पाहत आहेत. त्यांना माहित आहे की, भारत आता थांबणार नाही. कोरोना काळानंतर एक नवीन वर्ल्ड ऑर्डर आकाराला येत आहे. बदलणाऱ्या विश्वाला आकार देण्यात तुमच सामर्थ्य दिसून येत आहे. कोरोना काळात भारत ज्या प्रकारे पुढे गेला, ते जगाने पाहिलं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

5. जी-20 शिखर परिषदेच्या यजमान पदावर भाष्य

आज देशाला जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. जी-20 च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामुळे भारतीयांची क्षमता जगासमोर आली, असं मोदी म्हणाले.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.